Friday, October 25, 2024
Homeनगरअकोले तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई

अकोले तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई

अकोले |प्रतिनिधी| Akole

खरीपाच्या हंगामात अकोले तालुक्यात रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य शेतकर्‍याला युरियाची एक गोणी मिळणेही मुश्किल झाले आहे. अनेक शेतकरी खतापासून वंचित आहेत. त्यामुळे तातडीने शेतकर्‍यांना रासायनिक खते उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकर्‍यांच्यावतीने ग्राहक पंचायतीनेे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनातून केली.

- Advertisement -

सदर निवेदन अकोले तालुकाध्यक्ष दत्ता शेणकर, मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, रामदास पांडे यांनी दिले. अकोले तालुक्यातील अनेक दुकानदार खते विकताना नको असलेले खते घेतल्याशिवाय हवी ती खते देत नाहीत. शेतकर्‍यांना अशी सक्ती न करण्याचे आदेश कृषी अधिकारी व कृषी दुकानदारांना देण्यात यावे. याबाबत तालुका कृषी अधिकारी व पंचायत समितीच्या कृषी अधिकार्‍यांना 4 जुलै रोजी काही दुकानदार युरिया देत नाही व खतांचे लिंकिंग करत असलल्याबाबतचे पत्र देण्यात आलेले आहे.

त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी, महेश नवले, माधव तिटमे, रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे, राम रूद्रे, रामदास पांडे, नरेंद्र देशमुख, ज्ञानेश पुंडे, अ‍ॅड. दीपक शेटे, अ‍ॅड. राम भांगरे, भाऊसाहेब वाळुंज, दत्ता ताजणे, प्रमोद मंडलिक, कैलास तळेकर, राजेंद्र घायवट, भाऊसाहेब वाकचौरे, पांडुरंग पथवे, सुगंधराव देशमुख, सखाराम खतोडे, सुदाम मंडलिक आदींनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या