Saturday, May 25, 2024
Homeनगरअकोले तालुक्यात करोनाचे 43 रुग्ण वाढले

अकोले तालुक्यात करोनाचे 43 रुग्ण वाढले

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यात काल शुक्रवारी नव्याने 43 व्यक्ती करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 1314 झाली आहे.

- Advertisement -

तर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी गेलेल्या तालुक्यातील 74 व्यक्तींचे अहवाल प्रतिक्षेत असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

काल शुक्रवारी घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्टमध्ये अकोले शहरातील चिरेबंदी येथील 50 वर्षीय महिला, कारखाना रोड वरील 45 वर्षीय पुरूष,शिवाजीनगर मधील 45 वर्षीय पुरूष,40 वर्षीय महिला,राजुर येथील 40 वर्षीय पुरूष, 34 वर्षीय पुरूष, 48 वर्षीय पुरूष 65 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महिला,22वर्षीय महिला,40 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला, 08 वर्षीय मुलगी, 02 वर्षीय मुलगा,

नवलेवाडी येथील 57 वर्षीय महिला,32 वर्षीय महिला,04 वर्षीय मुलगी, 50 वर्षीय महिला, निंब्रळ येथील 80 वर्षीय पुरूष, 19 वर्षीय तरुण,80 वर्षीय महिला, तांभोळ येथील 30 वर्षीय पुरूष, बहिरवाडी येथील 40 वर्षीय महिला, टाहाकारी येथील 42 वर्षीय पुरूष कुंभेफळ 40 वर्षीय पुरूष, कोतूळ येथील 49 वर्षीय पुरूष, खुंटेवाडी येथील 60 वर्षीय पुरूष, पिंपळगाव नाकविंदा 71 वर्षीय पुरुष, 68 वर्षीय महिला, 63 वर्षीय महिला,

कातळापूर येथील 35 वर्षीय पुरुष,70 वर्षीय पुरूष, 47 वर्षीय महिला, 29 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगी, 10 वर्षीय मुलगी,15 वर्षीय मुलगा, गुहीरे येथील 40 वर्षीय महिला, वारंघुशी येथील 28 वर्षीय पुरुष अशा 41 व्यक्तींचा करोना अहवाल पॅाझिटिव्ह आला तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात राजूर येथील देवीगल्लीतील 36 वर्षीय पुरूष, परखतपूर येथील 25 वर्षीय पुरूष असे 02 मिळून एकुण 43 व्यक्ती पॅाझिटिव्ह निघाले.

तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 1314 झाली आहे. त्यापैकी 1098 व्यक्ती बरे होऊन घरी गेलेले आहे. 20 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर 196 व्यक्ती उपचार घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या