Sunday, September 22, 2024
Homeनगरअकोले तालुक्यातील ज्ञानेश्वर आवारी यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

अकोले तालुक्यातील ज्ञानेश्वर आवारी यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

अकोले |प्रतिनिधी| Akole

- Advertisement -

मुंबई पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर आवारी यांना काल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. अकोले तालुक्यातील विठे गावातल्या कष्टकरी, शेतकरी कुटुंबात जन्मलेले आवारी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन मुंबई पोलीस दलात दाखल झाले. आपली विशिष्ट कार्यशैली आणि गुणवत्तेच्या बळावर विविध पदांवर काम करताना त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

2019 साली ज्ञानेश्वर आवारी यांचा मुबंई पोलीस कमिशनरकडून उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून सन्मान झाला होता. अनेक गुन्ह्यांच्या तपासासाठी त्यांनी घेतलेली मेहनत दखलपात्र ठरली आहे.

अकोले तालुक्यातील एका सुपुत्राचा राष्ट्रपती पारितोषिकाने सन्मान होत आहे.याबाबत तालुक्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या