अकोले |प्रतिनिधी| Akole
अकोले नगरपंचायतीची निवडणूक कालावधीची मुदत दि. 25 नोव्हेंबर 2020 रोजी समाप्त होत असल्याने
अकोले नगर पंचायतीची प्रभाग रचनांतधित करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. प्रभाग रचनेसाठी आवश्यक असलेले आदेश राज्य निवडणूक आयोगाने जारी केले आहे. यामुळे पुढील महिन्यात 25 तारखेला मुदत संपणान्या अकोले नगरपंचायतीच्या निवणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
प्रभाग रचना अंतिम करण्याबाबतचे संबंधित आदेश अधिक्रमित करून राज्य निवडणूक आयुक्त यांनी त्यांचे अधिकार मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांना प्रदान केले आहेत.
आरक्षणासह प्रास्प प्रभाग रचना करणे, हरकती व सूचनांवरील सुनावणी घेणे व अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करणे, असे प्रभाग रचनेचे तीन मुख्य टप्पे केले असून प्रभाग रचना करताना प्रामुख्याने या निवडणुकांकरिता जनगणना कार्यालयाची सन 2011 च्या जनगणनेची आकडेवारी वापरण्यात यावी, प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित केला आहे.
1) प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव नगर पंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती अनुसूचित जमातीची च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसुचित जाती अनुसूचित जमाती आरक्षण यासह जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करणे दि. 21/10/2020 2) पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे दि. 22/10/2020, 3) सदस्य पदांच्या आरक्षणाच्या खोडतीकरिता नोटीस प्रसिध्द करणे दि 3/11/2020, 4) नगरपंचायतीच्या सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत काढणे दि. 20/11/2020, 5) प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची रहिवाश्यांच्या हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी दि. 18/11/2020 ते दि. 26/11/2020 पर्यंत 6) प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देणे.
4/12/2020, 7) तरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन संबंधित जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, यांच्याकडे अहवाल पाठविणे दि. 10/12/2020, संबंधित विभागीय आयुक्त दि 17/12/2020 रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देतील प्रभाग निहाय एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची लोकसंख्या तसेच आरक्षणासह अधिनियमातील कलम 10 नुसार जिल्हाधिकारी दि. 24/12/2020 रोजी अंतिम अधिसूचना जाहीर करतील असा कार्यक्रम जाहिर करण्यात आला आहे. तालुक्यातील राजकीय सत्ता बदलांतर होणारी नगर पंचायतीची पहिलीच निवडणूक असून दिवाळी नंतर राजकीय फटाक्यांची आतिषबाजी उडणार आहे.