Saturday, May 18, 2024
Homeनगरशाळा उघडताना गेट अंगावर पडलं, विद्यार्थ्यांचा मृत्यु

शाळा उघडताना गेट अंगावर पडलं, विद्यार्थ्यांचा मृत्यु

अकोले | प्रतिनिधि

शाळेचे गेट अंगावर पडल्याने पांडुरंग बाळु सदगीर (रा. मुथाळणे, ता. अकोले) या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आज शनिवारी सकाळी समशेरपूर येथील अगस्ति विद्यालयात शाळा उघडताना ही घटना घडली. या घटनेत आणखी एक विद्यार्थी जखमी झाला आहे.

- Advertisement -

आज शनिवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी शाळा उघडण्यापूर्वीच विद्यार्थी बाहेर जमले होते. शनिवारी सकाळची शाळा असते. त्यामुळे परिसरातील गावांतून सकाळीच विद्यार्थी आले होते. बस पहाटेच असल्यामुळे काही विद्यार्थी वेळेच्या आधीच शाळेत येतात. त्यानुसार पांडुरंग सदगीर हाही आला होता. शाळा उघडण्याची वेळ झाल्यानंतर काही विद्यार्थी गेट उघडण्यासाठी गेले. तर काही विद्यार्थी गेटमधून आत प्रवेश करण्यासाठी पुढे गेले होते.

गेट उघडत असताना ते तुटून खाली पडले. गेट पडताना पाहून काही मुले तेथून पळाल्याने वाचली. मात्र, पांडुरंग बाळु सदगीर हा दहावीतला विद्यार्थी गेटखाली दबला गेला. त्याला पळण्याची संधीच मिळाली नाही. त्याच्या डोक्याला मार लागला. गेट जड असल्याने मुलांना उचलता येत नव्हते. शिवाय गेट पडल्याने मुले घाबरली होती. त्यानंतर शिक्षक आणि मुलांनी मिळून गेट उचलले. तोपर्यंत सदगीर गंभीर जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. तर बबलु सदगीर हा मुलगा जखमी झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या