Tuesday, May 6, 2025
Homeक्राईमअकोलेच्या सहा गावांमधील अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई

अकोलेच्या सहा गावांमधील अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई

अकोले |प्रतिनिधी| Akole

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर येथील भरारी पथक व संगमनेरच्या पथकाने अकोले तालुक्यातील 6 गावांमधील 7 ठिकाणांवर छापा मारत अवैध दारु विक्रेत्यांवर धडक कारवाई करत 1 लाख 9 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -

आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दोन आठवड्यांपूर्वी बैठक घेऊन अवैध दारू विक्री बंद होण्यासाठीच्या सूचना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व पोलिसांना दिल्या होत्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनीही तीव्र भावना व्यक्त केली होती. यानंतर उत्पादन शुल्क संगमनेर विभागाचे निरीक्षक श्री. सहस्त्रबुद्धे यांनी मागील आठवड्यात नाशिक व इतर ठिकाणचे अधिकारी व कर्मचारी यांना बरोबर घेऊन अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करत मुद्देमाल जप्त केला होता. या संयुक्त पथकाने हिवरगाव आंबरे, वीरगाव फाटा, तांभोळ, निळवंडे, निंब्रळ व राजूर या गावांमधील 7 अवैध दारु विक्री होत असलेल्या ठिकाणांवर शनिवारी (दि.3) छापा मारून देशी दारु व विदेशी दारु जप्त करुन एकूण 1 लाख 9 हजार 850 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात केला आहे.

यातील 7 आरोपींवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 नुसार गुन्हेा दाखल करण्यात आले आहे.सदर कारवाई विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक प्रमोद सोनोने, उपाधीक्षक प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर भरारी पथक क्र. 2 व संगमनेर विभाग यांनी केली आहे. यापुढेही ही कारवाई सुरुच राहणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शनीशिंगणापूर परिसरात वादळी वार्‍यासह गाराचा पाऊस

0
शनिशिंगणापूर |वार्ताहर|Shani Shingnapur नेवासा तालुक्यातील (Newasa) शनिशिंगणापूर परिसरात आज (सोमवार) वादळी वार्‍यासह (Stormy Winds) गाराचा तडाखा बसला. वारा जोराचा असल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून...