मुंबई | Mumbai
बदलापूर (Badlapur) अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवारी पोलिसांनी (Police) एन्काऊंटर केला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे.अशातच आता या प्रकरणाचा तपास सीआयडी (CID) करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा : …असा झाला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
याबाबत माहिती देतांना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,”ही घटना पोलीस कोठडीतील (Police Custody) मृत्यूशी संबंधित असल्याने त्याचा तपास महाराष्ट्र (Maharashtra) सीआयडी करणार आहे. मुंब्रा बायपासवर ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे सीआयडी अधिकाऱ्यांचे पथक जाणार आहे. तसेच घटनेच्या वेळी वाहनात (Vehicle) उपस्थित असलेल्या पोलिसांचे जबाबही ते नोंदवणार आहेत.याशिवाय अक्षय शिंदेच्या आई-वडिलांचेही जबाब देखील सीआयडी अधिकारी घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : Akshay Shinde Encounter : मोठी बातमी! अक्षय शिंदेचा मृत्यू झालेल्या गाडीत काय सापडले? फॉरेन्सिक टीमच्या तपासात मोठे अपडेट आले समोर
दरम्यान,शिंदेचा मृतदेह आज (मंगळवारी) सकाळी ठाण्यातील (Thane) कळवा नागरी रुग्णालयातून शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे.जे रुग्णालयात (J J Hospital) नेण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह (Dead Body) त्याच्या कुटुंबियांकडे सोपविण्यात येणार आहे. दुसरीकडे अक्षयचा एन्काऊंटर झाल्यानंतर बदलापूरमध्ये लोकांनी फटाके फोडत आणि पेडे वाटत जल्लोष साजरा केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा