Friday, November 22, 2024
HomeराजकीयAkshay Shinde Encounter : "अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला…"; जितेंद्र...

Akshay Shinde Encounter : “अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला…”; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केली खळबळजनक ऑडिओ क्लीप

मुंबई | Mumbai

बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.

- Advertisement -

अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरून विरोधकांकडून पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. आता आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नेमका कसा झाला याबाबत पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत.

जितेंद्र आव्हाड यांनी हे ट्विट करताना अक्षय शिंदे याची जी हत्या झाली, ज्याला आता एन्काउंटर म्हणून संबोधले जाते आहे, ती कुठे झाली, हे प्रत्यक्ष पाहणारा काय म्हणतो, ते ऐका…निदान एखादी कथा सांगताना ती खोटी आहे, हे उघडकीस येणार नाही, याची तरी काळजी पोलिसांनी घ्यायला हवी होती असं सांगत त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये २ अज्ञात व्यक्ती संबंधित एन्काउंटरवर संवाद साधताना दिसतात. जेव्हा ही घटना घडली तेव्हा नेमकं काय झालं याबाबतचा मंब्रामधील एक युवक दावा करताना दिसतो.

हे हि वाचा : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? निवडणूक आयुक्त राजीव कुमारांनी स्पष्टच सांगितलं

या ऑडिओ क्लिपमध्ये २ अज्ञात व्यक्ती एकमेकांशी बोलत आहे. त्यात एक युवक समोरच्या सांगतो की, अक्षय शिंदेचा मर्डर जेव्हा झाला त्याच्यामागे माझीच गाडी होती. माझ्यामागे पोलीस लागतील म्हणून मी कुणालाही काही बोललो नाही. मी आणि माझा मेहुणा मुंब्रा बायपासवरून एका रॅलीला चाललो होतो. मुंब्राचा डोंगर चढत असताना पोलिसांची व्हॅन आम्हाला ओव्हरटेक करत पुढे आली. त्या व्हॅनला पडदे लावले होते. तेव्हा गाडीत थक करून मोठा आवाज आला. आम्हाला वाटलं गाडीचे पाटा वाजला असावे, पुन्हा आवाज आला तेव्हा आम्ही घाबरलो. त्यानंतर त्यांनी व्हॅन थांबवली. २ पोलिसवाले उतरले त्यांनी मागचा दरवाजा उघडला आणि पुन्हा बंद केला. त्यानंतर तिसरा आवाज आला. तेव्हा आम्ही तिथून पुढे निघून गेलो. ते कळव्याच्या दिशेने गेले आणि टी जंक्शनच्या बाजूने वळलो असं हा युवक सांगताना दिसतो.

तसेच आम्ही पुढे गेलो तेव्हा मोबाईलवर न्यूज वाचली, अक्षय शिंदे एन्काउंटर केला. या ऑडिओत समोरचा व्यक्ती युवकाला घाबरण्याची गरज नाही असं सांगत असतो. रॅलीच्या वेळी पोलिसांनी अक्षय शिंदेला मारले असा युवक दावा करतो. वाय जंक्शनचा नवीन ब्रीज सुरू होतो तिथून पुढे झाल्याचं पोलीस सांगतायेत असं समोरील व्यक्ती युवकाला सांगतो. त्यावर तिथे नाही, तर फकिरशा बाबा दर्गापासून थोडे पुढे गेलो ना, तिथे थक करून आवाज आला. मुंब्राहून कळव्याच्या दिशेने येताना हे घडले. दर्गा पार केल्यानंतर पोलिसांनी आमच्या व्हॅनला ओव्हरटेक केले. हे पोलिसवाले गणवेशात नव्हते. सिव्हिल ड्रेसमध्ये होते. ३ आवाजानंतर ब्रीज जिथं संपतो, रेल्वे ट्रॅकजवळ ते थांबले. आम्ही येत असताना ते पाहिले. मात्र माझा मेहुणा बोलला, भाईजान इथून चल उगाच आपण अडकू. व्हॅनला काळे पडदे लावले होते असा दावा युवकाने या संभाषणात केला.

हे हि वाचा : सोने पॉलिश करण्याचा बहाणाकरुन 4 तोळे दागिन्यांची चोरी

दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी जितेंद्र आव्हाडांच्या या आरोपांना उत्तर दिलं आहे. अफवा पसरवण्यात हातकंडा असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडून कथित ऑडिओ क्लिप पसरवली जात आहे.पोलिसांची व सरकारची प्रतिमा मालिन करण्यासाठी आव्हाड साहेबाकडून ही क्लिप स्क्रिप्टेड बनवलेली वाटत आहे. ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ याची चौकशी करावी, असं सूरज चव्हाण म्हणालेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या