Saturday, April 26, 2025
HomeराजकीयAkshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले….

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून आव्हाडांना वेगळीच शंका; म्हणाले….

मुंबई | Mumbai

बदलापूरमधील शाळकरी मुलीसोबत झालेल्या प्रकरणामुळे राज्यात संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. बदलापूरजवळ झालेल्या या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या.

- Advertisement -

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मात्र वेगळीच शंका उपस्थित केली आहे.विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाही मात्र अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा संशयास्पद आहे असं आव्हाडांनी म्हंटल. एवढच नव्हे तरं अक्षयला शाळेतील काही गुपितं माहीत होती का? असं म्हणत शाळेची व संस्थेबद्दलची माहिती दडपण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

हे ही वाचा : “अक्षयचे हात बांधलेले, तोंडावर बुरखा होता, कुणाला वाचविण्यासाठी…”; VIDEO शेअर करत संजय राऊतांचा आरोपांचा भडीमार

काय म्हटलंय जितेंद्र आव्हाड यांनी?

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आधीच ३ गोष्टी घडल्या.

१. FIR दाखल करण्यात व अटक करण्यात उशीर
२. पोलिसांवर दबाव
३. शाळा व संस्थाचालकांची ओळख लपवण्याचा प्रयत्न

या सगळ्या नंतर आज अक्षय शिंदे या आरोपीचा झालेला एन्काऊंटर हा संशयास्पद आहे, हे स्पष्ट आहे. शिंदेला शाळेतील काही गुपित माहीत होते का, असा प्रश्न इथे उपस्थित होतो. यावरूनच शाळेची व संस्थेबद्दलची माहिती दडपण्याचा हा प्रयत्न आहे.

हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो. या अशा घटना फक्त युपी-बिहारमध्ये होतात. महाराष्ट्र हे कायद्याने चालणारं राज्य आहे, त्याचा युपी-बिहार करू करा..!

विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाही आहोत. आम्हालाही हेच वाटतं, की या अक्षम्य व घृणास्पद कृत्यासाठी गुन्हेगाराला फाशीच व्हायला हवी. पण हे एन्काऊंटरसारखे स्टंट अत्यंत चुकीचे आहेत. ही काही हुकूमशाही नाहीये, की राज्याच्या प्रमुखाच्या मनात आलं म्हणून कोणाचा तरी एन्काऊंटर केला. ही लोकशाही आहे, आणि यात न्यायपालिकाच गुन्हेगाराला शिक्षा आणि पीडितांना न्याय देते. कायद्याप्रमाणे फाशीही देता येतेच. सरकारने जलदगती न्यायालय आणि त्याची योग्य प्रक्रिया पार पाडली असती, तर ९० दिवसांत सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली गेली असती. पण या प्रकरणाच्या बाबतीत Political Heroism आणि जवळच्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नातच सरकार सुरुवातीपासून आहे.

महाराष्ट्रातील जनता हे असे स्टंट चांगली ओळखून आहे. ते ही कायदेहीन संस्कृती सहन करणार नाही.

हे ही वाचा : …असा झाला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0
पुणे । प्रतिनिधी Pune जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...