Tuesday, April 29, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAkshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या मृत्यूचे कारण काय?, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा...

Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदेच्या मृत्यूचे कारण काय?, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

मुंबई | Mumbai

बदलापूर (Badlapur) अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवारी पोलिसांनी (Police) एन्काऊंटर केला आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

- Advertisement -

या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. अशातच आता अक्षय शिंदेच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले आहे. अक्षय शिंदेचा शवविच्छेदन (Akshay Shinde Postmortem Report) समोर आला असून, त्यातून पोलिसांनी झाडलेली गोळी अक्षय शिंदे कुठे लागली, हेही समोर आले आहे.

अक्षय शिंदे यांचा मृत्यू अति रक्तस्त्रावामुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालातून (Postmortem Report) समोर आलं आहे. अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : …असा झाला अक्षय शिंदेचा एन्काऊंटर, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम

हा शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडे (Mumbra Police) सुपूर्द करण्यात आला आहे. जेजे रुग्णालयात (JJ Hospital) सात तास सुरू असलेल्या शवविच्छेदन प्रकियेची व्हिडीओग्राफी देखील करण्यात आली आहे. जेजे रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांच्या पॅनलनं अक्षय शिंदेचं शवविच्छेदन केलं आहे.

बदलापूर प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठीच अक्षय शिंदेची हत्या केल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. याप्रकरणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी आज तातडीची सुनावणी होणार आहे.

हे ही वाचा : हे ही वाचा : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट

चकमक कशी झाली?

पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याच्या उद्देशाने पोलिस अधिकाऱ्याच्या कमरेचे सरकारी पिस्तुल अक्षय याने हिसकावले. नंतर पोलिसांवर गोळीबार केला. गोळी लागल्याने खाली पडलेले एपीआय मोरे यांच्याकडील पिस्तुल घेतल्यानंतर तो एकालाही जिवंत सोडणार नाही, असे ओरडू लागला.

हे ही वाचा : अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून आव्हाडांना वेगळीच शंका;

त्याने पोलिसांच्या दिशेने पिस्तुल रोखत दोन गोळ्या झाडल्या. मात्र, नशिबाने या गोळ्या कुणाला लागल्या नाहीत. अक्षय याचे रौद्ररूप आणि त्याच्या देहबोलीवरून तो पिस्तुलमधून गोळ्या झाडून आम्हाला ठार मारणार अशी खात्री झाल्यानंतर प्रसंगावधान राखून स्वसंरक्षणार्थ माझ्या सरकारी पिस्तूलामधून अक्षयच्या दिशेने एक गोळी झाडली. यात जखमी होऊन अक्षय खाली पडल्याचे पोलिस तक्रारीमध्ये म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : बाप नव्हे हा तर हैवान! पोटच्या मुलाची केली...

0
नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road येथील जेलरोड परिसरात (Jail Road Area) असलेल्या मंगलमूर्ती नगरमध्ये राहणाऱ्या सुमित भारत पुजारी याने आपला आठ वर्षाचा मुलगा (Son)...