Saturday, May 4, 2024
Homeजळगावअरेच्च्या.. नगरसेवक स्वत: फाईली घेवून फिरतात तेव्हा ...

अरेच्च्या.. नगरसेवक स्वत: फाईली घेवून फिरतात तेव्हा …

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आगामी येणारी मनपा निवडणूक (municipal election) त्यात अनेक नगरसेवकांच्या (corporators) प्रभागात थेट राज्यशासनाकडून मिळालेल्या निधीतून कामे (Works from funds) करण्यासाठी नगरसेवकांची सद्या चांगलीच धावपळ सुरू आहे. नगरसेवक स्वःता कामांची फाईली घेवून थेट अधिकार्‍यांकडून कामे मंजूर (approve) करण्यासाठी त्यांची भागमभाग महापालिकेच्या इमारतीमध्ये (Municipal building) सध्या दिसत आहे.

- Advertisement -

शहर महापालिकेतील बांधकाम विभागातील शहर अभियंताच्या दालनात विकास कामे घेणार्‍या ठेकेदारांची चांगलीच गर्दी होत आहे. दालनात शहर अभियंत्याला चारही बाजूने गराडा घातला असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. मार्च एण्डिंग पूर्वी झालेल्या कामांचे बिले काढणे, नवीन कामे घेण्यासाठी ठेकेदारांची झालेली गर्दीचा मनपाच्या वर्तुळात सध्या चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.

जळगाव शहरातील विविध विकास कामे, रस्ते, गटारी आदी प्रकल्पांचे कामे हे शहर अभियंता यांच्या माध्यमातून होत असतात. जळगाव महानगरपालिकेचे शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांच्या दालनात गेल्या पंधरा ते विस दिवसापासून मनपाचे विकास कामे घेण्यार्‍या मक्तेदारांची गर्दी चांगलीच दिसत आहे. शहर अभियंताच्या दालनात दररोज हे चित्र दिसत असून अभियंताच्या दालनात मक्तेदारांच्या या गर्दीचा विषयावर मात्र सर्वत्र चर्चा होत आहे.

थकीत बिले, नवीन कामांसाठी गर्दी

महापालिकेच्या माध्यमातून विविध निधी, मनपा फंडातून शहरात रस्ते, गटारी आदी विकास कामे मक्तेदारांच्या माध्यमातून केले जात असतात. या कामांचे बिल हे मार्च ऐंडीग पूर्वी काढण्यासाठी मक्तेदारांची सद्या लगबग दिसत आहे. त्यात नविन कामे मिळावीत यासाठी थेट शहर अभियंताच्या दालनात मक्तेदारांचा गराडा दिसत आहे.

आयुक्तांच्या तिढ्यामुळे रेंगाळली होती कामे

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना तत्काळ राज्यशासनाने कार्यमुक्त करून त्यांच्या जागेवर देविदास पवार यांची आयुक्तपदी नियुक्त केली होती. डॉ. गायकवाड यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटने पवार यांचा आयुक्तपदाचे आदेश रद्दचा निर्णय दिला होता. तब्बल तिन महिने आयुक्त पदाचा तिढा झालेला होता. मनपातील विकास कामांवर याचा परिणाम झाला होता. मॅटने धोरणात्मक निर्णय न घेण्याचे आदेश दिले होते. झालेल्या कामांच्या बिलांचे फाईली पेडीग असल्यामुळे शहरातील विविध भागातील कामे ही थांबलेली होती. आता सर्व कामे सुरू झाले असून झालेल्या कामांचे बिले काढण्याची लगबग आता दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या