कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav
उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मनाई वस्ती परिसरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकला (Alcohol Den Police Raid) असता यावेळी एक लाख 41 हजार रूपयांचे रसायन व इतर साहित्य नष्ट (Destroyed) करण्यात आले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांना कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत मनाई वस्ती येथे एका नाल्याजवळ दोन इसम बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने मनाई वस्ती परिसरात सुरू असलेल्या गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा (Alcohol Den Police Raid) टाकून दोन इसमांना ताब्यात घेतले. यावेळी एक लाख 41 हजार रुपयांचे रयासन व इतर साहित्य पोलिसांनी नष्ट केले.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात (Kopargav City Police Station) पो.हे. कॉ. अशोक शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी नाना फकीरा तांबे व नाना गायकवाड यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली पो. स. इं. ठोंबरे, पो. कॉ. इरफान शेख, अशोक शिंदे, राजेश पुंड, पोलिस नाईक श्याम जाधव, ज्ञानेश्वर गांगुर्डे, गणेश काकडे यांनी केली आहे.