Saturday, July 27, 2024
Homeनगरबर्थडे पार्टीत तरुणीसह चार डॉक्टर झिंगाट

बर्थडे पार्टीत तरुणीसह चार डॉक्टर झिंगाट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बोल्हेगाव (Bolhegav) उपनगरात साईदर्शन बिल्डिंग (Sai Darshan Building) जवळ एका तरुणीसह चार जण दारूच्या नशेत (Alcohol Intoxicated) बेधुंद होऊन डान्स करत धिंगाणा घालत असल्याची माहिती स्थानिकांनी तोफखाना पोलिसांना (Topkhana Police Station) दिली. रात्र गस्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक किरण सुरसे (Assistant Inspector of Police Kiran Surase) पथकासह तातडीने घटनास्थळी पोहचले. तरुणीसह चौघे बेफान नाचत सार्वजनिक शांततेचा भंग (Violation of public peace) करत असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी चारही व्यक्तींना ताब्यात घेत थेट पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत समज देऊन नंतर सोडून देण्यात आले. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली. संबंधित चार व्यक्तींमध्ये तीन डॉक्टर (Doctor) असून एक नर्स (Nurse) असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील दोन खासगी हॉस्पिटलमधील (private hospital) तीन तरुण डॉक्टर (Young doctor) व एक नर्स (Nurse) एका वाढदिवसाच्या (Birthday) निमित्ताने एकत्र आले होते. त्यांनी बोल्हेगाव (Bolhegav) उपनगरातील साईदर्शन बिल्डिंगजवळ पार्टी ठेवली. वाढदिवसाची पार्टीत या आरोग्य क्षेत्रातल्या चार जणांना दारू काहीशी चांगलीच झिंगली. यानंतर त्यांनी साईदर्शन इमारती नजीक धिंगाणा घालत नाच सुरू केला. त्यांचा आरडा-ओरडा वाढल्याने स्थानिकांनी तोफखाना पोलिसांना (Topkhana Police) याची कल्पना दिली. यानंतर सहायक निरीक्षक सुरसे यांनी सहकार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या डॉक्टर मंडळींचा धिंगाणा सुरूच होता.

पोलिसांना पाहताच या मंडळींची बोबडी एवढी वळली की आपली ओळख लपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अखेर निरीक्षक सुरसे यांना या झिंगलेल्या डॉक्टर मंडळींना थेट तोफखाना पोलीस ठाण्यात आणावे लागले. मोठी कारवाई होईल आणि इज्जतीचा पंचनामा होण्याच्या भीतीने त्यांनी शहरातील कामानिमित्ताने असलेल्या नामांकित हॉस्पिटलच्या डॉक्टरांना साकडे घातले. त्यांची ओळख पटल्यानंतर नोंद घेत पोलिसांनी एक तरुणी आणि तीन तरुण अशा चार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करत पुन्हा असे काही करणार नाही, या लेखी जबाबावर सोडून देण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या