Friday, May 3, 2024
Homeनाशिकव्यसनमुक्ती केंद्रात मद्यपीची आत्महत्या

व्यसनमुक्ती केंद्रात मद्यपीची आत्महत्या

नाशिक | Nashik

व्यसन सोडवण्यासाठी केंद्रांत दाखल केलेल्या पूणे येथील मद्यपीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना नवीन नाशिक येथील अश्विननगर भागात घडली.

- Advertisement -

बाबुराव बारसू माकडी (55 रा.भोसरी, पूणे) असे आत्महत्या करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. बाबुराव माकडी हे खासगी कारखान्यात नोकरीस होते. मद्याच्या आहारी गेल्याने कुटूंबियांंनी त्यांना रविवारी (दि.28) येथील मोक्ष व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते.

दुसर्‍या दिवशी सकाळच्या सुमारास माकडी यांनी डबल बेडच्या वरील पाईपाला फाडलेला टोवेल बांधून गळफास लावून घेतला होता.

ही बाब निदर्शनास येताच केंद्राचे कर्मचारी नितीन खोडे आणि संतोष सरवणकर यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सखाहरी गारले करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या