Friday, May 3, 2024
HomeUncategorizedवर्षातून दोनदाच मद्यप्राशन वाहन तपासणी

वर्षातून दोनदाच मद्यप्राशन वाहन तपासणी

नाशिक | निशिकांत पाटील | Nashik

मद्यप्राशन (Alcohol consumption) करून गाडी चालविल्याने सध्या दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असून रात्रीच्या वेळी अशा वाहन चालकांची तपासणी करून कारवाई केल्यास अपघातांच्या (accidents) प्रमाणात घट होईल, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

शहरात गेल्या कित्येक वर्षांपासून 31 डिसेंबर व श्रावण सुरु होण्यापूर्वी एक दिवस अगोदर असलेली दीप अमावस्या असे दोन दिवस ब्रेथ अल्कोहोल ऍनालायझर (Alcohol analyzer) या मशीनद्वारे वाहन चालकाने मद्य प्राशन केले आहे की नाही, याची तपासणी करण्यात येते. वास्तविक पाहता मुंबई (mumbai)- पुणे (pune) सारख्या शहरात दररोज रात्री सदरहू तपासणी केली जाते. यामुळे मद्यप्राशन (Alcohol consumption) केलेला व्यक्ती आपल्यासोबत चालक घेऊन जातो व परिणामी अपघाताचे (accident) प्रमाण देखील कमी होते.

सध्या नाशिक (nashik) शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे व मद्यप्राशन करून वाहन चालवणार्‍यांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील बियर बारच्या (Beer bar) बाहेर असलेल्या पार्किंगवरून किती लोक मद्यप्राशन करून गाडी चालवतात, याचा अंदाज येतो. हेल्मेट वापराविना दुचाकी चालवित असतांना जर अपघात झाला तर त्यात मृत्यूची शक्यता जास्त असते. मात्र मद्यप्राशन करून गाडी चालविणार्‍यांकडे पोलीस प्रशासनाने (Police Administration) लक्ष देणे देखील गरजेचे आहे.

मद्यप्राशन (Alcohol consumption) करून वाहन चालविल्यास दहा हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. मात्र तरीही काही वाहनचालक पोलिसांची तपासणी नसल्याने बिनधास्तपणे मद्यपान करून गाडी चालवितात. मुंबई- पुण्यासारखी तपासणी नाशकात सुरु झाल्यास शहरात घडणार्‍या बर्‍याच अपघातांना आळा बसेल. शहरात बर्‍याच ठिकाणी होणार्‍या अपघातांची पोलीस ठाण्यात नोंद नसली तरी किरकोळ स्वरूपात घडणारे अपघात हे घडतच असतात.

यामध्ये पोलीस ठाण्याची वारी नको या विचाराने अपघातग्रस्त दवाखान्यात वेगळी काहीतरी कारणे सांगून आपला ईलाज करून घेतात. नाशिक शहरात कॉलेज रोड, गंगापूर रोड, नवीन नाशकातील काही भाग आदी परिसरात बर्‍याच वेळा मद्यधुंद अवस्थेत काही तरुण आपली दुचाकी वेगाने चालवितात व वेगाने गाडी चालविण्याच्या नादात अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही.

पोलीस प्रशासनाने जर दररोज किंवा नाकेबंदीच्या वेळी वाहन चालकांची ब्रेथ अल्कोहोल ऍनालायझरद्वारे तपासणी करावी. जेणेकरून मद्यपान करून वाहन चालविणार्‍यांवर आळा बसेल व परिणामी अपघातांच्या प्रमाणात घट होईल, असे मत नाशिककरांमधून व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या