मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. अजित पवार हे काल (रविवारी) विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आले होते. त्यानंतर आज अजित पवारांच्या हस्ते पुण्यात (Pune) विविध विकासकामांचे उद्घाटन होणार होते. पंरतु, त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
अजित पवारांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम दौरे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांनी काल रविवारी (दि.१६ ) नाशिकमध्ये आमदार सरोज आहिरे (MLA Saroj Ahire) यांच्या देवळाली मतदारसंघातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती अचानक खराब झाली होती. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात प्रकृती ठीक नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर ते पुण्याला आले होते. मात्र, रात्री उपचार घेतल्यानंतरही त्यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घशाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच अजित पवार यांना नाशिकमध्ये उन्हाचा त्रास (Summer Trouble) झाल्याने आणि ताप असल्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या बैठका रद्द केल्या होत्या, त्यानंतर ते पुण्याला रवाना झाले होते. यानंतर आज देखील त्यांना त्रास होत असल्यामुळे त्यांनी दिवसभरातील कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.