Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याभुजबळांना सिद्धगड, मुश्रीफांना विशाळगड तर मुंडेंना प्रचितगड; NCP च्या ९ मंत्र्यांना मिळालेल्या...

भुजबळांना सिद्धगड, मुश्रीफांना विशाळगड तर मुंडेंना प्रचितगड; NCP च्या ९ मंत्र्यांना मिळालेल्या बंगल्यांची यादी

मुंबई | Mumbai

राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेपाठोपाठ (Shivsena) राष्ट्रवादीमध्येही (NCP) बंडखोरी झाल्याने राजकीय वर्तुळात भूकंप झाला आहे. अशातच, रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा आहे. यामुळे कोणाला किती खाती मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर त्यांचे खातेवाटप रखडले असले तरी मंत्र्यांना काल (मंगळवारी) बंगले आणि दालनांचे वाटप करण्यात आलं आहे.

- Advertisement -

छगन भुजबळ यांना सिद्धगड, दिलीप वळसे पाटलांना सुवर्णगड बंगला, हसन मुश्रीफ यांना क-8 विशाळगड देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांना क-6 प्रचितगड, धर्मरावबाबा आत्राम यांना सुरुची -3 आणि अनिल पाटील यांना सुरुचि 8, संजय बनसोडे यांना सुरुचि 18 बंगला देण्यात आला आहे. मात्र, आदिती तटकरे यांना अद्याप बंगला मिळालेला नाहीय. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना मंत्रालयातील दालनांचे वाटपही करण्यात आले आहे. भुजबळ यांना दालन क्रमांक 201, मुश्रीफ यांना 407, वळसे पाटलांना 303 आणि बनसोडेंना 301 दालन मिळाले आहे. मुंडे यांना दुसऱ्या मजल्यावर २०४ आणि २१२ दालन देण्यात आले आहे. आत्राम यांना 601, 602 आणि 604 दालन मिळाले आहेत. आदिती तटकरे यांना 103 क्रमांकाचे दालन मिळाले आहे.

Accident News : भीषण अपघात! भरधाव पिकअपची पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर जखमी

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांचा शपथविधी पार पडून 10 पेक्षा जास्त दिवस उलटूनही अद्याप मंत्री खात्याविनाच आहेत. गेल्या वर्षभरापासून मंत्रिपदाची वाट पाहणाऱ्या शिंदे गटातील आमदारांचा नव्याने आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना महत्त्वाची खाती देण्यास विरोध असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच खातेवाटप लांबलं जात असल्याची चर्चा आहे. त्यातच रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटपावर महत्त्वाची चर्चा झाली. यावेळी खातेवाटपावर एकमत झालं आहे.

Accident News : स्कूल बसला भरधाव कारची धडक, भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला असून, खातेवाटप लांबणीवर पडलं आहे. दरम्यान, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत खातेवाटपाचा तिढा सुटला असल्याची माहिती आहे. ‘वर्षा’वर रात्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाची चर्चा झाली. बैठकीत खातेवाटप व मंत्रिमंडळ विस्तार याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. कोणाला कोणतं खातं मिळणार, कोण मंत्री होणार याची यादी तयार करण्यात आली आहे. यासोबतच वादाला पूर्णविराम मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या