Monday, May 20, 2024
Homeनाशिकनदी प्रदुषण रोखण्यासाठी प्रशासनासोबत शैक्षणिक संस्थांही मैदानात

नदी प्रदुषण रोखण्यासाठी प्रशासनासोबत शैक्षणिक संस्थांही मैदानात

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तंत्रज्ञानात (technology) प्रगती करतांना आपल्या प्राचीन नद्या (Ancient rivers) लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. अनेक नद्यांमध्ये प्रदुषण (Pollution in rivers) वाढत आहे.

- Advertisement -

नदी प्रदुषण (River pollution) रोखण्यासाठी शासन प्रशासनासोबतच दिल्ली पब्लिक स्कूलच्या (Delhi Public School) माध्यमातून रामकुंड (ramkund) परिसरात पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली.

गोदावरी संवर्धन उपक्रमांतर्गत (Godavari conservation activities) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (Maharashtra Pollution Control Board), महानगरपालिका (Municipal Corporation), माहिती व जनसंपर्क कार्यालय, गोदावरी नदी संवर्धन समिती आणि दिल्ली पब्लिक स्कूल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी (students) गोदावरीतील (godavari) प्रदूषण रोखण्यासाठी पथनाट्यासह विविध गोष्टींच्या माध्यमातून जनप्रबोधन केले.

यावेळी मुलांनी गोदावरी नदीत (godavari river) कचरा टाकू नये, नदीला प्रदुषित करु नये यासाठी नागरीकांना आवाहन केले. यावेळी मुलांनी कविता सादर करीत गोदावरी वाचवण्याचे आवाहन केले. रॅलीद्वारे ’कल करे सो आज ,आज करे सो अब । नदीयोंको बचानेमे, सहयोग देंगे कब?’ अशा विविध घोषणांद्वारे गोदाकाठ दुमदुमून टाकला होता. या मुलांनी गोदावरी संवर्धनासाठी (Godavari Conservation) उचललेले हे पाऊल महत्वाचे आहे आणि त्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अमर दुर्गुळे, माहिती व जनसंपर्क कार्यालयाचे ज्ञानेश्वर ईंगवे, नाशिक महानगर पालिकेचे उपायुक्त डॉ विजयकुमार मुंडे, दिल्ली पब्लिक स्कूल चे संचालक सिद्धार्थ राजगडीया, प्रशांत दवंगे, गोदावरी नदी संवर्धन समिती चे निशिकांत पगारे, आरोग्य अधिकारी डॉ आवेश पलोड, आरोग्य निरीक्षक संजय दराडे, जमदाडे,

प्रदुषण नियंत्रण मंडळाचे संजीव रेदासणी, संतोष मोहरे, राजेंद्र सूर्यवंशी, नागरे, नितीन चौधरी, अनिकेत चौधरी, गोदावरी समितीचे मुक्तेश्वर मुंनशेट्टीवर, डॉ अजय कापडणीस, योगेश बर्वे, रोहित कानडे, जगबिरसिंग, प्रकाश बर्वे, डॉ. प्रभाकर वायचळे, किरण काळे शिक्षकवृंद गुंजन शर्मा, श्वेता व्ही, निरु बक्षी, भावना कुलकर्णी, भालेराव दिल्ली पब्लिक स्कूलचे विद्यार्थी व नाशिककर मोठ्या संख्यने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या