Friday, May 31, 2024
Homeजळगावबहिणाबाई निरक्षर असल्या तरी भावसाक्षर

बहिणाबाई निरक्षर असल्या तरी भावसाक्षर

जळगाव – Jalgaon

बहिणाबाई या योगभ्रष्ट कवयित्री होत्या. त्यांची मुशाफिरी प्रतिभेच्या प्रदेशातील आहे. माणूस हा केंद्रबिंदू मानुन त्यांनी कविता रचल्या अशा निरक्षर बहिणाबाईंचे नाव विद्यापीठाला देण्याची ही जगातील एकमेक अद्भुत घटना असावी. त्या निरक्षर असल्या तरी भावसाक्षर होत्या. असे मत सुप्रसिध्द कवी व गझलकार कमलाकर देसले यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तिसर्‍या नामविस्तार वर्धापनदिनानिमित्त बुधवारी ११ ऑगस्ट रोजी कार्यगौरव सोहळा व कवी देसले यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.बी.व्ही. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील उपस्थित होते.

सुरुवातील मानवतेचा संदेश देणार्‍या विमलबाई हिरामण भिल यांना विद्यापीठाचा पहिला कवयित्री बहिणाबाई चौधरी गौरव पुरस्कार या समारंभात बहाल करण्यात आला. तसेच या अपघातात मदत करणार्‍या तेरा गावकर्‍यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचलन प्रा.जी.ए.उस्मानी, प्रा.आशुतोष पाटील यांनी केले. आभार प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी मानले. यावेळी व्य.प.सदस्य प्राचार्य आर.एस.पाटील, प्रा.एस.आर.चौधरी, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य आर.पी.फालक, प्रा.मोहन पावरा, दीपक पाटील, विवेक लोहार, प्रा.जे.बी.नाईक, प्रा.मधुलिका सोनवणे, प्रा.के.एफ.पवार तसेच विजयालक्ष्मी वायुनंदन उपस्थित होते.

असे आहेत पुरस्कारार्थी

एएसएसएसपीएस कला, वाणिज्य व विज्ञान महा.नवापूर डॉ.ए.जी.जयस्वाल, उत्कृष्ट महाविद्यालय विद्यावर्धिनी महा.धुळे उत्कृष्ट शिक्षक डॉ.गुणवंत सोनवणे, किसान महा.पारोळा व डॉ.हितेंद्र महाजन आरसीपटेल इन्स्टिट्युट ऑफ फार्मा, शिरपूर उत्कृष्ट शिक्षक विद्यापीठीय प्रा.डी.एस.पाटील स्कुल ऑफ फिजिकल सायन्सेस विद्यापीठ, संतोष मनुरे (मु.जे.महा.जळगाव), उत्कृष्ट कर्मचारी वर्ग- ४ गणेश पाटील (पुज्य सानेगुरुजी प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महा.शहादा) व शालीग्राम गर्दे (विद्यावर्धिनी महा.धुळे), मोहिनीराज नेतकर (स्कुल ऑफ फिजिकल सायन्सेस विद्यापीठ), संजय ठाकरे (सामान्य प्रशासन विभाग) व दिनकर पाटील (बांधकाम विभाग) उत्कृष्ट कर्मचारी वर्ग-४ (विद्यापीठीय) प्रभाकर पवार (कंत्राटी कर्मचारी), डॉ.पी.के.दशमुख (एचआर पटेल इन्स्टि.ऑफ फार्मा, शिरपूर) व डॉ.एच.एम.पटेल (आरसी पटेल इन्स्टि. फार्मा, शिरपूर निधी पुरस्कार- डॉ.एस.एस.घोष (स्कुल ऑफ फिजिकल सायन्सेस विद्यापीठ) प्रकाशन पुरस्कार- प्रा.डी.एस.दलाल (स्कुल ऑफ केमिकल सायन्सेस), प्रा.जे.बी.नाईक (युआयसीटी), प्रा.ए.एम.महाजन (स्कुल ऑफ फिजिकल सायन्सेस ) प्रा. रत्नमाला बेंद्रे (स्कुल ऑफ केमिकल सायन्सेस), प्रा.एस.व्ही.पाटील (स्कुल ऑफ लाईफ सायन्सेस), प्रा.पी.पी.माहुलीकर (स्कुल ऑफ केमिकल सायन्सेस), मु.जे.महाविद्यालय,जळगाव, उत्कृष्ट महाविद्यालय- महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महा.चोपडा उत्कृष्ट शिक्षक (महाविद्यालयीन) डॉ.अतुल शिरखेडकर (आरसीपटेल इन्स्टिट्युट ऑफ फार्मा, शिरपूर), डॉ.ए.टी.कळसे (चव्हाण महा.चाळीसगाव) उत्कृष्ट शिक्षक (विद्यापीठीय) -प्रा.बी.एल.चौधरी (स्कुल ऑफ लाईफ सायन्सेस), पंडित माळी (किसान महा.पारोळा), (विद्यापीठीय) सिताराम बच्छाव, (परीक्षा विभाग) व मनोज निळे (संगणक केंद्र, परीक्षा विभाग) संशोधन पुरस्कार (महाविद्यालयीन) प्रा.एस.डी.येवले (पीओ नाहटा महा. भुसावळ) व डॉ.पी.ओ.पाटील (एचआर पटेल इन्स्टि. फार्मा, शिरपूर), प्रकाशन पुरस्कार- प्रा.डी.एस.दलाल (स्कुल ऑफ केमिकल सायन्सेस), प्रा.जे.बी.नाईक (युआयसीटी), प्रा.बी.एल.चौधरी (स्कुल ऑफ लाईफ सायन्सेस), प्रा.एस.व्ही.पाटील (स्कुल ऑफ लाईफ सायन्सेस), प्रा.पी.पी.माहुलीकर (स्कुल ऑफ केमिकल सायन्सेस), प्रा.रत्नमाला बेंद्रे (स्कुल ऑफ केमिकल सायन्सेस), स्वामीत्व हक्क पुरस्कार- प्रा.बी.एल.चौधरी (स्कुल ऑफ लाईफ सायन्सेस) यांना प्रदान करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या