Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याWorld Tourism Day: चवदार वाईनपासून ते इन्होवेशन हबपर्यंत नाशिक ठरतोय ट्रॅव्हलर्सचं नवं...

World Tourism Day: चवदार वाईनपासून ते इन्होवेशन हबपर्यंत नाशिक ठरतोय ट्रॅव्हलर्सचं नवं डेस्टिनेशन

नाशिक | प्रतिनिधी

मंत्रभुमीकडुन तंत्रभुमीकडे नाशिकची वाटचाल झाली असली तरी धार्मिक क्षेत्र म्हणून नाशिकची ओळख कायम असुन नाशिकला निसर्गाची भरभरून देणगी लाभल्याने वर्षभर येेथे पर्यटनास वाव निर्माण झाला आहे. उच्च मध्यमवर्गीयांंना परवडणाऱ्या दरात येथे सेवा सुविधा उपलब्ध असल्याने नाशिकचे पर्यंटन पुर्वी पेक्षा २५ टक्क्यांंनी वाढु लागले आहे.

- Advertisement -

आज जागतीक पर्यंटन दिन. त्यानिमीत्ताने नाशिकच्या पर्यटन विकासाचा आढावा घेत असतांंना वर्षातील दहा महीने येथे हमखास पर्यटकांचेे वास्तव्य असल्याचे आढळुन येत आहे. नाशिक म्हटलें, की येथील चवदार द्राक्षे, पंचवटीतील राममंदिर, कपालेश्वर, त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग तसेच सप्तशृंंगगडावरील सप्तशृंगी देवीचे अधिष्ठान. या धार्मिक पर्यटनाच्या सोबतीला आता हेल्थ अ‍ॅन्ड वेलनेस टुरिझम, कृषी पर्यटन, अ‍ॅडव्हेंचर टुरिझमंचाही नव्याने उगम झाला आहे.

नाशिक पर्यटन तीन दिवसात हमखास होते. विशेष म्हणजे फार खर्चही येत नाही. एका व्यक्तीला सहा – सात हजार रुपये पुरेसे ठरतात. पहिल्या दिवशी नाशिक पांडव लेणी ,मुक्तीधाम, तपोवन, टाकळी रामदास स्वामी मठ, तेथून पंचवटी सर्व मंदिराच्या भेटी, गंगा गोदावरी काठी ,नंतर गंगापूर रोड नवशा गणपती ,सोमेश्वर, बालाजी मंदिर. मग त्रंबकेश्वर दर्शन करून परत येता येते.

दुसऱ्या दिवशी वणी सप्तशृंगी देवी दर्शनासाठी व तेथून सापूतारा हे गुजरात सीमेवरील थंड हवेचे ठिकाणी भेट देवून परत आले तरी चालते. तिसऱ्या दिवशी घोटी जवळ कावनई तिर्थ,भंडारदरा, वैतरणा धरण भेट ,भंडारदरा येथे अंब्रेला फाँल चालू असेल तर पाहता यतो.

किंवा नाशिक वरून शिर्डीला निघाले तर ठीक १० वाजेस आरामात शिर्डीला पोहचता येते. त्यानंतर साईसमाधी दर्शन, द्वारकाबाई, चावडी आणि खंडोबा मंदिर दर्शन २ तासात करुन त्यानंतर शनिशिंगणापूर पोहचण्यास २ तास लागतात.

शनि महाराज दर्शन घेऊन परत येता येते. नाशिक मध्ये येणाऱ्या पाहुण्यांना हे नाशिक दर्शन घडवीले तरी त्यांचे बरेच समाधान होते. आजही नाशिक इतर शहराच्या तुलऩेने परवडणारे असल्याने नाशिकला पर्यटकांचा ओढा आता वाढु लागला आहे. एक पर्यटक आला की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या दहा जणांना रोजगार उपलब्ध होतो. रोज पाच दहा हजार जण नाशिकला आलेे तर ५० हजार जणाना कायमचा रोजगार उपलब्ध होईल.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या