Sunday, December 15, 2024
Homeजळगावअमळनेर : गॅस सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री

अमळनेर : गॅस सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री

अमळनेर – प्रतिनिधी amalner

घरगुती वापरासाठी असलेल्या गॅसची खाजगी वाहनात भरण्यासाठी काळ्या बाजारात विक्री करताना एक एच पी कंपनीची गाडी ३० सिलेंडर सह पोलिसांनी रंगेहाथ पकडून तिघांवर जीवनावश्यक वस्तू कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील मिळचाळ भागात शाळा नंबर १० जवळ घरगुती वापराची गॅस सिलिंडर ची गाडी काळ्या बाजारात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती डीवायएसपी सुनील नंदवाळकर याना मिळल्यावरून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील, हितेश बेहरे, भटूसिंग तोमर, मेघराज महाजन, गणेश पाटील याना पाठवले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याठिकाणी एच पी कंपनीची गाडी क्रमांक एम एच १९, सी वाय ९५३९ मधून सिलिंडर उतरवले जात होते.

पोलिसांनी छापा मारून फारुख जहुर शेख वय ४८ रा प्रतापनगर गलवाडे रोड, चालक प्रमोद नारायण पाटील वय ४१ रा सप्तशृंगी कॉलनी, अमळनेर व मदतनीस अनिल बाबुराव शिंदे वय ५२ रा.तांबेपुरा अशा तिघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडून ४९ हजार ८०० रुपये किमतीचे ३० भरलेले सिलेंडर आणि १ खाली तर तीन लाख रुपये किमतीची गाडी व त्यात भरलेले १० सिलेंडर ,६ हजार रुपये किमतीचा इलेक्टरीक पंप, १५०० रुपयांचा इलेक्टरीक वजन काटा असा एकूण ३ लाख ५७ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील करीत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या