Tuesday, March 25, 2025
Homeजळगावदोन्ही दादांच्या कार्यकाळात गुन्हेगारी, अवैध धंद्यांत वाढ - धनगर दला पाटील

दोन्ही दादांच्या कार्यकाळात गुन्हेगारी, अवैध धंद्यांत वाढ – धनगर दला पाटील

अमळनेर । प्रतिनिधी

साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर तालुक्यात गेल्या दहा वर्षात राजकारण व समाजकारण यात मोठ्या प्रमाणावर बदल झाला असून सुसंस्कृत समाजकारणाचे दिवस परत आणण्यासाठी डॉ.शिंदेच पर्याय असल्याची ग्वाही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनगर दला पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

दादा म्हणवणार्‍या आजी-माजी आमदारांच्या कार्यकाळात तालुका मोठ्या प्रमाणावर अशांत बनला आहे. याच दहा वर्षात गावागावात अवैध धंदे वाढले असून त्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली आहे. आजी माजी आमदार एकमेकांचे गुन्हेगारांसोबत असलेले फोटो व्हायरल करून एकमेकांना उघडे पाडत आहेत.

मात्र ह्या दोघांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक वादांना तोंड फुटले असून तालुका अशांत बनला आहे. अशावेळी महाविकास आघाडीचे सुसंस्कृत उमेदवार डॉ.अनिल शिंदे यांना निवडून देणे हाच एकमेव पर्याय असून जनतेने आता दोन्ही दादांची दादागिरी संपवावी असे आवाहन करत डॉ.अनिल शिंदे यांनाच सुज्ञ जनतेचा मोठा कौल मिळेल असा विश्वास धनगर पाटील यांनी व्यक्त केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...