Monday, June 24, 2024
Homeनगरअमरापूर परिसरातून सौरपंपासह अडीच लाखांची चोरी

अमरापूर परिसरातून सौरपंपासह अडीच लाखांची चोरी

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

- Advertisement -

श्री क्षेत्र अमरापूर शिवारात रविवारी (दि.27) पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणच्या शेतातील सौरपंपाच्या प्लेटा व विद्युत मोटार असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. तसेच चोरट्यांनी जाताना शेतातील पाईप लाईनची तोडफोड करून व काही क्षेत्रातील कपाशी उपटून मोठे नुकसान केले आहे.

विजेला कंटाळून अनेक शेतकर्‍यांनी स्वखर्चाने सौर उर्जेचे पंप बसविले आहेत. यासंदर्भात भारत मोटकर यांनी आपल्या आव्हाने रस्त्यावरील शेतातील विहिरीवर बसविलेल्या सौर उर्जेच्या 15 प्लेट चोरीला गेल्याची तसेच शेतातील कपाशीची बरीच झाडे उपटून नुकसान केल्याची फिर्याद शेवगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी 80 हजारांच्या नुकसानीची नोंद केली आहे.

याचवेळी श्री रेणुका माता देवस्थानचे मागील बाजूस काही अंतरावर दीपक शंकर क्षीरसागर यांच्या शेतातील विहिरीवरील सौर उर्जेची पाच अश्वशक्तीची मोटार व स्टार्टर चोरीला गेला आहे. येथील सौर उर्जेच्या काही प्लेटांची मोडतोड झाली असून शेवगाव पोलिसांनी पंचनामा केला आहे. फिर्याद दाखल करण्याचे काम उशीरापर्यंत चालू होते. हवालदार नेताजी मरकड, प्रशांत आंधळे अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या