Thursday, May 2, 2024
Homeनाशिकअंबड औद्योगिक वसाहत पोलिस चौकीचे 'या' तारखेला होणार उदघाटन

अंबड औद्योगिक वसाहत पोलिस चौकीचे ‘या’ तारखेला होणार उदघाटन

नवीन नाशिक | प्रतिनिधी | Navin Nashik

अंबड पोलीस ठाणे (Ambad Police Station) अंकित पण पोलीस ठाण्यानुसार चालणाऱ्या अंबड औद्योगिक वसाहत पोलिस चौकीचे (Ambad Industrial Estate Police Station) उदघाटन सोमवारी (दि .१० एप्रिल) सायंकाळी ५ वाजता होणार असल्याची माहिती नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे (MLA Seema Hirey) यांनी चौकीच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी दिली.

- Advertisement -

यावेळी आमदार हिरे यांच्यासह पोलिस आयुक्त अंकुश शिंदे (Police Commissioner Ankush Shinde), पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी (Deputy Commissioner of Police Chandrakant Khandvi), पोलिस उपायुक्त गुन्हे शाखेचे प्रशांत बच्छाव, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली, भाजपचे माजी नगरसेवक राकेश दोंदे, रश्मी हिरे यांनी चौकीला भेट देऊन पाहणी केली. अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad Industrial Estate) वाढत्या गुन्हेगारीमुळे स्वतंत्र पोलिस ठाणे असावे, अशी पंचक्रोशीतील नागरिक उद्योजकांची मागणी होती.

अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन अंबड औद्योगिक वसाहत साठी स्वतंत्र पोलिस ठाणे (Independent Police Station) निर्मिती चा प्रस्ताव तत्कालीन पोलिस आयुक्त यांनी गृह विभागाकडे पाठविला होता. नवीन पोलिस ठाणे निर्मितीचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. तो पर्यत अंबड औद्योगिक वसाहत येथे पोलिस ठाणे प्रमाणेच काम चालणारी पोलिस चौकी सुरु करणार आहे.

या चौकीचे सध्या काम सुरु आहे. यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली (Senior Police Inspector Suraj Bijli) यांनी नवीन पोलिस चौकी येथे पोलिस अधिकारी व कर्मचारी याचे कक्ष तसेच इतर माहिती दिली. तसेच पोलिस चौकीचे काम लवकरच पुर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार हिरे यांनी सांगितले की, चुंचाळे अंबड तसेच अंबड औद्योगिक वसाहत या भागात गुन्हेगारी (criminality) वाढल्याने अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून

अंबड औद्योगिक वसाहती साठी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्मिती करावी यासाठी सभागृहात ही मागणी केली आहे व त्याचा पाठपुरावा सुरू आहे तसेच नवीन पोलिस ठाणेचा प्रस्ताव गृह विभागाकडे आहे लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे तो पर्यत अंबड औद्योगिक वसाहत पोलिस चौकी येथे पोलिस ठाणे प्रमाणे कामकाज चालणार आहे.

या चौकीचे उदघाटन सोमवारी (दि .१० एप्रिल) सायंकाळी ५ वाजता होणार आहे. नवीन चौकीसाठी एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक आणि ३० अमलदारांची नियुक्ती करण्यात आले आहे. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक वसंत खतेले,उपनिरीक्षक संदिप पवार, उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश वराडे, रामदास दातीर, संजय गुंजाळ, अनिल माळी उपस्थित होते .

- Advertisment -

ताज्या बातम्या