Wednesday, July 24, 2024
Homeनगरअंबडच्या लाठीमाराचा जिल्ह्यात निषेध

अंबडच्या लाठीमाराचा जिल्ह्यात निषेध

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जालना (Jalana) जिल्ह्यातील अंबड (Ambad) येथे मराठा आरक्षण मागणीसाठी (Maratha Reservation Demand) उपोषण करणारांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध (Protest) शनिवारी जिल्ह्यात झाला. मराठा क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या नेत्यांसह मराठा महासंघ, संभाजी ब्रिगेड व अन्य नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका (Criticism) केली. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची राज्यस्तरीय बैठक शनिवारी दुपारी मुंबईत (Mumbai) होणार असून, यावेळी महाराष्ट्र बंदची हाक दिली गेली तर जिल्ह्यात बंद यशस्वी करण्याचा निर्धारही व्यक्त केला गेला आहे.

अंबड (Ambad) तालुक्यातील अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण (Maratha Reservation) उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार (Police Baton) केल्याचे पडसाद शुक्रवारी सायंकाळपासूनच राज्यभरात उमटायला सुरुवात झाली होती. शनिवारी सकाळी राज्यभरातील व नगर जिल्ह्यातील एसटी वाहतूकही बंद होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मराठा संघटनांच्या नेत्यांनी आपापल्या संघटनांच्या माध्यमातून पोलिसांच्या लाठीमाराचा निषेध (Police Baton Protest) करताना जिल्हास्तरावर आंदोलनाचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले.

संभाजी ब्रिगेडचे सोमवारी आंदोलन

संभाजी ब्रिगेडचे दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी शनिवारी दुपारी नगरला पदाधिकारी व सदस्यांचाी बैठक घेऊन जिल्ह्यातील आंदोलनाचे नियोजन करणार असल्याचे सांगितले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देणार असल्याचे सांगताना अंबड येथे झालेल्या लाठीमाराच्या घटनेचा निषेध केला व पोलिसांच्या या भूमिकेविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच भिंगारमध्ये संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक शनिवारी सायंकाळी होणार असल्याचे सांगण्यात आले.

महासंघाने केले आंदोलन

मराठा महासंघाने जिल्ह्यातील अकोले तसेच कर्जत व जामखेड येथे शनिवारी आंदोलन केले आहे व जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन दिले असल्याची माहिती मराठा महासंघाचे ज्येष्ठ नेते संभाजी दहातोंडे यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या मुंबईतील बैठकीत होणार्‍या निर्णयास मराठा महासंघाचा पाठिंबा असेल व त्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मारले त्यांना… जखम आम्हाला

मी एक समाजबांधव म्हणून जालन्यातील घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो. आमचे दैवत राजे छत्रपती यांची शिकवण लक्षात ठेवून कोणत्याही प्रकारे जनतेचे नुकसान होऊ नये, या हेतूने कोणताही बंद पुकारत नाही, परंतु या घटनेचा जाहीर निषेध करतो, अशी भावना संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अच्युत गाडे यांनी व्यक्त केली. पोलिसांनी मारले त्यांना.. परंतु जखम आम्हाला झाली.. मराठा आरक्षणाचे कायदेशीर व संवैधानिक मार्गाने चालणार्‍या आंदोलन व उपोषणावर लाठीचार्ज करणार्‍या सरकारचा जाहीर निषेध… निषेध… व निषेध, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या