Thursday, May 23, 2024
HomeनाशिकNashik Crime News : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तिघे तडीपार

Nashik Crime News : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तिघे तडीपार

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीत सार्वजनिक शांतता,कायदा व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होईल असे गुन्हेगारी कृत्य व गुन्हे करून जनजीवन विस्कळीत करणाऱ्या तिघांवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Commissioner of Police Ankush Shinde) यांच्या आदेशान्वये तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे…

- Advertisement -

Nashik News : गोणीत आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ

याबाबत अधिक माहिती अशी की, अंबड पोलीस ठाणे व चुंचाळे पोलीस चौकी हद्दीत दहशत कायम रहावी यासाठी साथीदारांसह मारहाण (Beating) करून महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून नुकसान करणे, विनापरवाना बेकायदेशिररित्या घातक हत्यार जवळ बाळगून दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना मिळून येणे, मारहाण करून दुखापत करणे, मारहाण करून जबरी चोरी करणे, चोरी करणे, मारहाण करून दुखापत करून नागरिकांच्या मनात भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांना तडीपार (Externee) करण्यात आले आहे.

Asian Games 2023 : भारतीय घोडेस्वारांची ऐतिहासिक कामगिरी; तब्बल ४१ वर्षांनतर जिंकले सुवर्णपदक

यामध्ये लक्ष्मण उर्फ लक्ष्या राजेंद्र कोळी ( वय २१, रा. घरकुल शिवार, चुंचाळे, अंबड, नाशिक), निखील सुभाष लाड (वय २२, रा. एन ५१, अडी २४/५, महाकाली चौक, पवननगर, नवीन नाशिक), सतिष बबन माने ( वय २१, रा. माउली चौक, दत्तनगर, अंबड, नाशिक) यांचा समावेश असून या तिघांना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांनी दोन वर्षांकरिता पोलीस आयुक्तालय व नाशिक ग्रामीण हद्दीतून (Nashik Rural Limits) तडीपार केले.’

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Nashik Rain News : नाशकात पावसाची ‘जोर’ धार; नागरिकांची तारांबळ

- Advertisment -

ताज्या बातम्या