Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे निलंबन; सभागृहात लाड यांना शिवीगाळ करणे...

मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे निलंबन; सभागृहात लाड यांना शिवीगाळ करणे भोवले

मुंबई | Mumbai

काल विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्यात सोमवारी खडाजंगी झाली. यावेळी अंबादास दानवे यांनी लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आज त्यांच्याविरोधात प्रसाद लाड यांनी आक्रमक होत विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या देत दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर आता विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

YouTube video player

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Ghore) यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन केले आहे. त्यामुळे आता अंबादास दानवे यांना पाच दिवस विधानपरिषदेत उपस्थित राहता येणार नाही. तसेच दानवे यांचे निलंबन झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आक्रमक झाले. यानंतर नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याच्या परवानगी दिली असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आक्रमक झाले आणि त्यांनी आक्षेप घेतला. यानंतर विरोधकांना संधी न देता पुढील कामकाज सुरु करण्यात आले. 

हे देखील वाचा : पावसाने पुन्हा जोर धरला! अनेक भागांसाठी अलर्ट जारी

दरम्यान, निलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा (Suspend) प्रस्ताव मांडल्यानंतर मताला टाकला. त्यानंतर आवाजी मतदानाने अंबादास दानवे यांचे निलंबन करण्यात आले. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी निलंबनाच्या कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभागृह दणाणून सोडले.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : कांदा उत्पादकांची परवड सुरुच !

0
शेतकर्‍यांविषयी सर्वच राजकीय पक्षांना पुळका येत असतो, यात आता तसे काही नाविन्य राहिलेले नाही. प्रत्येकजण आम्हीच कसे शेतकरी हितकर्ते असा आव आणतात, हे देखील...