Saturday, April 18, 2026
HomeनगरAMC : विकासाच्या आश्वासनांसह 1710 कोटींचे बजेट

AMC : विकासाच्या आश्वासनांसह 1710 कोटींचे बजेट

कर वसुलीवर प्रश्नचिन्ह || निधीवर महापालिकेची भिस्त

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर शहर वासियांना चांगल्या दर्जाचे रस्ते, मूलभूत आरोग्य सेवा, स्ट्रीट लाईट, शुध्द व मुबलक पाणी, निरोगी आरोग्य या चांगल्या दर्जाच्या सेवा देण्यासाठी महापालिका बांधिल आहे, असे प्रशासनाव्दारे स्पष्ट करताना यासाठी शासनाकडून प्राप्त होणार्‍या विविध विकास कामांसाठीच्या निधीवर शहराचा विकास अवलंबून असल्याचेही अप्रत्यक्षपणे कबूल केले गेले आहे. मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे यांना मंगळवारी (17 मार्च) महापालिकेचे यंदाचे 1710 कोटीचे अंदाजपत्रक सादर केले आहे. यानिमित्त व्यक्त केलेल्या मनोगतात त्यांनी प्रशासनाच्या यंदाच्या विकास कामे नियोजनाची माहिती दिली आहे.

- Advertisement -

दरम्यान, मनपाच्या सुमारे सव्वा दोनशे कोटीवर गेलेल्या संकलित कर थकीत रकमेच्या वसुलीचे नियोजन कसे करणार, याचे भाष्य मनोगतात नाही. पण, यंदाची अपेक्षित संकलित कर वसुली सुमारे 103 कोटीची बजेटमध्ये दाखवली आहे. त्यामुळे या वसुली नियोजनासाठी आता स्थायी समितीलाच नियोजन तयार करून ते अंमलबजावणीसाठी मनपा प्रशासनाला द्यावे लागणार आहे. दरम्यान, स्थायी समितीत सादर झालेल्या बजेटवर आज बुधवारपासून (18 मार्च) चर्चा केली जाणार आहे.

अहिल्यानगर महापालिकेचे सन 2026-27 चे 1710 कोटीचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती सुभाष लोंढे यांच्याकडे आयुक्त डांगे यांनी सादर केले. यावेळी स्थायी समिती सदस्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आयुक्तांकडून स्थायी समिती सभापतींना यंदाचे बजेट सादर झाल्यावर त्याच्या अभ्यासासाठी एक दिवस मुदत द्यावी, असे बाबासाहेब वाकळे यांनी सुचवले. त्यास गौरी बोरकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर सभापती लोंढे यांनी सभा तहकूब करून आज बुधवारी दुपारी 1 वाजल्यापासून बजेटवर चर्चा करून महासभेसाठी शिफारशी करणार असल्याचे जाहीर केले.

बाराशे कोटी होणार जमा
मनपाच्या यंदाच्या अंदाजपत्रकात महसुली उत्पन्न 481 कोटी 4 लाख रूपये, भांडवली जमा 1161 कोटी 42 लाख अपेक्षित आहेत. महसुली उत्पन्नात संकलित करापोटी 103 कोटी 80 लाख, संकलित करावर आधारीत करापोटी 89 कोटी 70 लाख, जीएसटी अनुदान 151 कोटी 92 लाख व इतर महसुली अनुदान 17 कोटी 27 लाख, गाळा भाडे 3 कोटी 93 लाख, पाणीपट्टी 33 कोटी, मीटरद्वारे पाणी पुरवठापोटी 20 कोटी, इतर उत्पन्नापोटी 42 कोटी 39 लाख रुपये आहेत. तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरून 1161 कोटी 42 लाख रूपये अंदाजित जमा होणार आहेत.

वेतन-मानधनावर 162 कोटीचा खर्च
या आर्थिक वर्षात वेतन, भत्ते व मानधनावर 161 कोटी 90 लाख, पेन्शन, सेवा उपदान यावर 71 कोटी 50 लाख, पाणी पुरवठा वीज बिल 45 कोटी, स्ट्रीट लाईट वीज बिल 8 कोटी, शिक्षण विभाग वेतन हिस्सा 6 कोटी 50 लाख, महिला व बाल कल्याण योजना 2 कोटी 55 लाख, अपंग पुनर्वसन योजना 2 कोटी 55 लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना 8 कोटी 41 लाख, नगरसेवक मानधन 63 लाख, औषधे व उपकरणे 1 कोटी 70 लाख, नगरसेवक प्रभाग स्वेच्छानिधी 9 कोटी 62 लाख, कचरा संकलन व वाहतूक यावर 20 कोटी, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरूस्ती 1 कोटी 25 लाख, टँकरव्दारे पाणी पुरवठा व तुरटी, ब्लिचिंग पावडर खरेदी 2 कोटी 75 लाख, अशुध्द पाणी आकार 5 कोटी, अग्निशमन वाहने खरेदी 3 कोटी, नवीन रस्ते 1 कोटी 50 लाख, रस्ते दुरूस्ती 1 कोटी 50 लाख, इमारत दुरूस्ती 75 लाख, शहरातील ओढ-नाले साफसफाई 55 लाख, आपत्कालीन व्यवस्थापन 50 लाख, कोंडवाड्यावरील खर्च 12 लाख, वृक्षारोपण तदनुषंगिक खर्च 1 कोटी, हिवताप प्रतिबंधक योजना 60 लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी 1 कोटी, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त 1 कोटी 40 लाख, मालमत्ता सर्वेक्षण 10 कोटी, मृत जनावरे विल्हेवाट प्रकल्प 55 लाख, पुतळे बसविणे 1 कोटी, भविष्य निर्वाह निधी तूट 1 कोटी, बेवारस प्रेत विल्हेवाट 25 लाख, उद्यान दुरुस्ती 20 लाख यासह इतर बाबींबर खर्च अपेक्षित आहे.

ताज्या बातम्या

डंपरची

Nashik News: सी टू भवन समोर भीषण अपघात; डंपरची अनेक गाड्यांना...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधीनवीन नाशिक भागातील खुटवड नगर परिसरातील असलेल्या मधुर स्वीट जवळ एका डंपरने अनेक गाड्यांना धडक दिल्याची भीषण घटना घडली. शनिवारी (दि.१८)...