Friday, October 2, 2026
HomeनगरAMC : प्रशिक्षणास दांडी मारणार्‍या कर्मचार्‍यांना नोटीसा

AMC : प्रशिक्षणास दांडी मारणार्‍या कर्मचार्‍यांना नोटीसा

जनगणनेच्या कामासाठी मनपाकडून कर्मचार्‍यांना प्रशिक्षण सुरू

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेच्या वतीने जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी नियुक्त केलेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सध्या शहरातील विविध केंद्रांवर सुरू आहे. या प्रशिक्षणास गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, अनुपस्थित कर्मचार्‍यांना महापालिकेकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे.

- Advertisement -

डांगे यांनी सांगितले की, जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात एकूण 688 एचएलबी निश्चित करण्यात आले आहेत. या कामासाठी एकूण 883 प्रगणक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या सर्व कर्मचार्‍यांना या प्रक्रियेची अचूक माहिती मिळावी यासाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जात असून, दररोज तीनशे प्रगणक व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. सध्या शहरातील विविध समित्यांच्या अंतर्गत वेगवेगळ्या केंद्रांवर हे प्रशिक्षण सुरू आहे.

सावेडी समितीअंतर्गत श्री समर्थ विद्यामंदिर येथे सुरू असलेल्या प्रशिक्षणासाठी 100 कर्मचार्‍यांची नियुक्ती होती, मात्र त्यापैकी 14 कर्मचारी अनुपस्थित होते. शहर समितीअंतर्गत अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूल येथे सुरू असलेल्या 50 जणांच्या प्रशिक्षणात दोन जणांनी दांडी मारली. बुरूडगाव समितीअंतर्गत आनंदधाम रस्त्यावरील जनशक्ती ज्युनियर कॉलेजमध्ये 100 कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण सुरू असून त्यापैकी पाच जण अनुपस्थित होते.

तसेच, झेंडीगेट समितीअंतर्गत न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये 50 जणांचे प्रशिक्षण सुरू असून, तेथेही काही कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशिक्षणाकडे पाठ फिरवणार्‍या सर्व अनुपस्थित कर्मचार्‍यांची यादी तयार करण्यात आली असून, त्यांना नोटिसा काढण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे डांगे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

इन्व्हेस्ट

‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’! १० लाख कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार

0
मुंबई प्रतिनिधीमहाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य आणि देशाच्या औद्योगिक विकासाचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून...