Friday, April 25, 2025
HomeनगरAMC : मुदतीत कामे न करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा

AMC : मुदतीत कामे न करणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा

महापालिकेच्या तीन ठेकेदार संस्थांना नोटिसा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शासनाच्या अल्पसंख्यांक बहुलक्षेत्र विकास निधी योजनेतून मंजूर असलेल्या 3.30 कोटींच्या पाच कामांचे कार्यारंभ आदेश देऊनही ही कामे सुरू झालेली नाहीत. मे अखेर कामे पूर्ण न झाल्यास निधी परत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुदतीत कामे न केल्यास सदर कामे रद्द करून ठेकेदार संस्थेला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. या प्रकरणी तीन ठेकेदार संस्थांना शहर अभियंत्यांनी नोटीसा बजावल्या आहेत.

- Advertisement -

मे. ओमसाई कन्स्ट्रक्शन, मे. एस. एफ. शेख कन्स्ट्रक्शन, मे. एस. एस. शेख कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदार संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अल्पसंख्यांक बहुल नागरी क्षेत्र विकास योजनेतून अहिल्यानगर महापालिकेला सात कामांसाठी 4.25 कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. यातील प्रस्तावित कामांचे कार्यारंभ आदेश मागील वर्षी देण्यात आले आहेत. मात्र, मेहराज मस्जिद ते सहारा सिटी ते दर्गाह दायरा नाल्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकणे (80 लक्ष), शाह राजू दुर्वेश दायरे कब्रस्तान विकसीत करणे (80 लक्ष), नालसाहब सवारी ते फ़ौजदार मस्जिद ते हारून कुरेशी घरापर्यंत काँक्रिटीकरण करणे (60 लक्ष), फताह मस्जिद ट्रस्ट व हजरत सय्यद जलालशाह बुखारी कब्रस्तान विकसीत करणे (40 लक्ष), हाजी हसन शाह कादरी बागवान कब्रस्तान विकसीत करणे (70 लक्ष) ही 3.30 कोटी रूपये किंमतीची पाच कामे निधी उपलब्ध असूनही रखडली आहेत.

अद्यापही या ठिकाणी काम सुरू झालेले नाही. शासकीय योजनेअंतर्गत मंजूर कामे असल्याने ती मुदतीत होणे अपेक्षित आहे. शासनाच्या निर्देशानुसार ही कामे मे महिन्याअखेर पूर्ण न झाल्यास जून महिन्यात निधी परत जाण्याची शक्यता आहे. निधी परत गेल्यास कामात दिरंगाई केल्यामुळे ठेकेदार संस्थेवर जबाबदारी निश्चित करून, कार्यारंभ आदेश व कामे रद्द करुन ठेकेदाराविरुध्द नियमानुसार कारवाई केली जाईल. अनामत रक्कम जप्त करून ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...