Thursday, May 15, 2025
Homeनगरवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांना अंतरीम जामीन

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांना अंतरीम जामीन

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

- Advertisement -

अल्पवयीन मुलाच्या छळ प्रकरणात गुन्हा दाखल असलेले महापालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना जिल्हा न्यायालयाने अंतरीम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

डॉ. बोरगे यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर जिल्हा न्यायाधीश पी. व्ही. चतुर यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी झाली. डॉ. बोरगे यांच्या वतीने अ‍ॅड. शिवाजी सांगळे यांनी काम पाहिले. करोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. करोना काळात महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. बोरगे यांच्यावर जबाबदारी आहे. ते शहर सोडून जाणार नाहीत.

तपास कामात पोलिसांना सहकार्य करतील, असा युक्तिवाद अ‍ॅड. सांगळे यांनी न्यायालयासमोर केला. अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन त्याला मारहाण करत छळ केल्याप्रकरणी 28 जून रोजी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे, अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ, लिपिक बाळू घाटविसावे व मुलाची आई यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढणार का?...

0
पुणे | Pune  काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार माहिन्यात घ्या, असे आदेश दिले होते. न्यायालयाच्या (Supreme Court) या...