Monday, September 28, 2026
HomeनगरAMC : मनपाकडून नालेसफाईच्या कामाला सुरूवात

AMC : मनपाकडून नालेसफाईच्या कामाला सुरूवात

पहिल्या टप्प्यात तीन ओढे-नाल्याची सफाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला पहिल्या टप्प्यात तीन प्रमुख ओढे व नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने मशीनची संख्या वाढवून सफाईच्या कामाला गती देण्यात येईल. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

- Advertisement -

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईच्या कामासाठी महानगरपालिकेने नियोजन करून कामाला सुरूवात केली आहे. सोमवारी सनी पॅलेस ते अभियंता कॉलनी, भगवान बाबा चौक, शिरसाठ मळा, गावडे मळा, गजराज ड्रायक्लिनर, डी मार्ट, अर्जुन वॉशिंग सेंटर, कराळे क्लब हाऊस, सिना नदीपर्यंत, तसेच कलानगर, नरहरीनगर, कुष्ठधाम रस्ता, रासनेनगर, पंचशील हॉटेल, बालिकाश्रम रस्ता, शिंदे मळा, ताठे मळा, भूतकरवाडी पम्पिंग स्टेशन सीनानदीपर्यंत या सावेडी उपनगरातील दोन प्रमुख नाल्यांची व सारसनगर परिसरातील भिंगार नाल्याची साफसफाई सुरू करण्यात आली आहे.

तीन पोकलेन मशीन उपलब्ध करून हे काम सुरू करण्यात आले आहे. उद्या आणखी एक मशीन उपलब्ध होईल व आणखी एका नाल्याची साफसफाई सुरू होईल. शहरातील सर्व ओढे व नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल, या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे, असे डांगे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...