Monday, March 31, 2025
Homeनगरपवार, जपे, शेवाळे, पठाण, उंडे यांचा शिक्षक पुरस्काराने गौरव

पवार, जपे, शेवाळे, पठाण, उंडे यांचा शिक्षक पुरस्काराने गौरव

मालनताई ढोणे : महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने गौरव

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका शिक्षण विभागाच्यावतीने मनपा व खाजगी प्राथमिक शाळेतील गुणवंत शिक्षकांना महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. तर सेवानिवृत्त शिक्षक व आयएसओ मानांकन मिळवणार्‍या शाळेच्या मुख्यध्यापकांसह शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

माउली संकुल सभागृहात झालेल्या शिक्षकांच्या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर मालनताई ढोणे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके, उपसभापती सुवर्णा गेनाप्पा, नगरसेवक मनोज कोतकर, मनपा शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सुभाष पवार, पर्यवेक्षक जुबेर पठाण, डी. आर. कुलकर्णी, वसंत म्हस्के, खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ ठोंबरे, सचिव विठ्ठल उरमुडे, शहराध्यक्ष पारुनाथ ढोकळे, अरविंद गोरेगावकर आदींसह शालेय शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रशासन अधिकारी सुभाष पवार यांनी केले. यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे म्हणाल्या, आयएसओ मानांकन मिळवून महापालिकेच्या शाळा आपली गुणवत्ता सिध्द करीत आहे. समाजाचा व देशाचा पाया शिक्षक आहे. शिक्षक युवकांना दिशा देण्याचे कार्य करतात. शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडत असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मीना पवार (बाई इचरजबाई फिरोदिया), योजना जपे (समर्थ विद्या मंदिर), सुनिता शेवाळे (महाराष्ट्र बालक मंदिर), निलोफर पठाण (मनपा शाळा क्र.17), शेखर उंडे (पंचशील विद्या मंदिर) या पाच शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राष्ट्रपती शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.अमोल बागुल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर सेवानिवृत्त शिक्षकांसह आयएसओ मानांकन प्राप्त करणारे ओंकारनगर मनपा शाळा क्रमांक 2, रिमांड होम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा शाळा क्रमांक 4 या शालेय शिक्षकांचा सत्कार झाला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Walmik Karad : वाल्मिक कराडचा नवा कारनामा; फिल्म प्रोड्यूसर असल्याचा निलंबित...

0
मुंबई | Mumbai बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात (Murder Case) माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक...