Friday, May 1, 2026
HomeनगरAMC Election : निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना टपाली मतदानासाठी सुविधा

AMC Election : निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना टपाली मतदानासाठी सुविधा

मतदान असलेल्या प्रभागाच्या निवडणूक अधिकारी कार्यालयात 13 जानेवारीला मतदान

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रक्रियेसाठी सुमारे 1 हजार 800 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचार्‍यांना टपाली मतदानासाठी 13 जानेवारी रोजी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित कर्मचार्‍यांचे नाव ज्या प्रभागामध्ये असेल, त्या प्रभागाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी 10 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन वेळेत संबंधित कर्मचार्‍याला मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

- Advertisement -

शहरातील 345 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी 1800 कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून 29 डिसेंबर रोजी झालेल्या पहिल्या प्रशिक्षणादरम्यान संबंधितांना टपाली मतदानासाठी अर्ज देण्यात आले होते. त्यानंतर 6 जानेवारी रोजी झालेल्या दुसर्‍या प्रशिक्षणावेळी सुमारे साडेसातशे कर्मचार्‍यांनी टपाली मतदानासाठी नोंदणी केलेली आहे. मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांना मतदानाच्या दिवशी दिवसभर निवडणुकीचे कामकाज असणार आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी 13 जानेवारी रोजी टपाली मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय 6 निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे प्रभागांचे विभाजन करून देण्यात आलेले आहे. संबंधित कर्मचारी मतदाराचे ज्या प्रभागाच्या मतदार यादीत नाव असेल, त्या प्रभागाच्या निवडणूक कार्यालयात उभारलेल्या मतदान केंद्रात सदर कर्मचार्‍याला कर्मचार्‍याला टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे, केडगाव प्रभाग क्रमांक 15, 16 आणि 17 साठी भाग्योदय मंगल कार्यालयातील ऑफिसमध्ये टपाली मतदान सुविधा देण्यात आली आहे, असे आयुक्त डांगे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

मिसिंग

Mumbai-Pune Missing Link: मिसिंग नव्हे तर ‘कनेक्टिंग लिंक’, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई-पुणे...

0
पुणे | Puneमुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या आणि प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या बहुप्रतिक्षीत 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे आज दिमाखात लोकार्पण झाले. मुख्यमंत्री...