Tuesday, January 13, 2026
HomeनगरACM Election : बोटावरची शाई आता इतिहास जमा; महापालिका निवडणुकीत वापरले जाणार...

ACM Election : बोटावरची शाई आता इतिहास जमा; महापालिका निवडणुकीत वापरले जाणार मार्कर पेन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिका सार्वत्रिक निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. मतदान झाल्यानंतर मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणार्‍या शाईऐवजी सुमारे 1 हजार 200 मार्कर पेन वापरण्यात येणार आहेत. शहरात 17 प्रभागांमध्ये 345 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, प्रत्येक केंद्रावर तीन मार्कर पेन देण्यात येणार आहेत. यासोबतच 10 टक्के मार्कर राखीव ठेवण्यात येणार असल्याने एकूण 1 हजार 200 मार्करची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत आवश्यक साहित्य संकलनाची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मतदान केल्यानंतर प्रत्येक मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर निळ्या रंगाची शाई लावण्यात येत होती. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डिजिटल तंत्रज्ञानाच्या काळात मतदानाच्या प्रक्रियेत मतदान केंद्रावर गेल्यावर एक वेगळा बदल पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत बाटलीतील शाईत काडी बुडवून बोटावर लावली जाणारी पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा झाली असून त्याऐवजी आधुनिक मार्कर पेनचा वापर केला जाणार आहे.

YouTube video player

निवडणूक आयोगाने या प्रक्रियेसाठी शहरात एक हजार 200 विशेष मार्कर पेन दिले आहेत. मार्कर पेनच्या शाईमध्ये सिल्व्हर नायट्रेट हा मुख्य घटक आहे. जेव्हा या पेनने बोटावर रेघ ओढली जाते, तेव्हा त्वचेतील प्रथिनांशी त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन सिल्व्हर क्लोराईड तयार होते. परिणामी, ही शाई पाण्याने कितीही धुतली तरी निघत नाही. यापूर्वी नगर परिषदेच्या निवडणुकीत या प्रकारच्या मार्कर पेनचा वापर करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. यामुळे आता महापालिका निवडणुकीत मार्कर पेनने मतदारांच्या बोटावर रेघ मारण्यात येईल.

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपूर पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी कांचन सानप

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur श्रीरामपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी काँग़्रेसच्या कांचन दिलीप सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर काँग़्रेसच्या तीन तर भारतीय जनता पार्टी जनसेवा विकास आघाडीच्या...