Saturday, April 4, 2026
HomeनगरAMC Election : महापालिकेच्या लढाईसाठी नगरमध्ये जोर बैठका

AMC Election : महापालिकेच्या लढाईसाठी नगरमध्ये जोर बैठका

महायुतीत डॉ. विखे तर महाविकास आघाडीत खा. लंकेच निर्णय घेणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर लगेच राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती व महाविकास आघाडीत जोर बैठका बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. बुधवारी महायुती व महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांची प्राथमिक बैठक झाली आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत उमेदवारीसह अंतिम निर्णय हा महायुतीमध्ये माजी खासदार डॉ. सुजय विखे तर महाविकास आघाडीत खासदार नीलेश लंके घेणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

महानगरपालिका निवडणूक जाहीर होताच शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी (अजित पवार) या तिन्ही पक्षांकडून इच्छुकांच्या मुलाखती झाल्या असून त्यानंतर महायुतीच्या चर्चेला मुहूर्त मिळाला आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुतीची प्राथमिक बैठक बुधवारी दुपारी आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत त्यांच्या कार्यालयात झाली. यात तिन्ही पक्षातील विद्यमान नगरसेवक, संबंधित प्रभागाची रचना, त्यानुसार संभाव्य उमेदवार या विषयावर प्राथमिक चर्चा करण्यात आली. तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार), शिवेसना (ठाकरे गट) तर काँग्रेस अशी चर्चा झाली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटी व प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक झाली. निवडणुकीत युती करायची की स्वतंत्र लढायचे, याबाबत त्यांनी मते जाणून घेतली. मात्र, युती करण्याबाबत शिवसेना व राष्ट्रवादीशी चर्चा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी आ. जगताप यांची भेट घेतली. महायुतीच्या जागावाटपाबाबत चर्चा केली. महायुती म्हणून ही पहिली बैठक झाली असली तरी यापूर्वी बैठक झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसात डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक होणार असून त्यात जागा वाटप निश्चित केले जाणार आहे.

तसेच महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, काँग्रेसचे दीप चव्हाण व ठाकरे गटाचे शहरप्रमुख किरण काळे अशी बैठक झाली. महाविकास आघाडीत देखील अंतिम निर्णय हा खा. लंके यांचा मान्य होणार आहे. त्यामुळे जागा वाटपचा अंतिम निर्णय खा. लंके घेणार आहेत.

ताज्या बातम्या

Rahuri Assembly By-election : राहुरीत योग्यवेळी उमेदवार जाहीर करणार नी निवडणूकही...

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत असताना आता काँग्रेसनेही या लढतीत जोरदार एंट्री केली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहीत योग्यवेळी उमेदवार...