अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमाची, मतदान व मतमोजणी प्रक्रियेची, निवडणुकीसंदर्भात उपलब्ध सुविधा, कक्ष, समित्या आदींची माहिती राजकीय पक्षांना देण्यात येणार आहे. येत्या सोमवारी (22 डिसेंबर) महानगरपालिकेत सर्व राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षांची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 ते 17 च्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने जाहिर केलेला आहे. निवडणुक कार्यक्रमानुसार 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया व 16 जानेवारी रोजी मतमोजणी निश्चीत करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेची निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्षांना माहिती होण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षाच्या शहर अध्यक्षांनी सोमवारी 22 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता आयुक्त सभा कक्ष येथे बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन आयुक्त डांगे यांनी केले आहे.




