Thursday, April 2, 2026
HomeनगरAhilyanagar : मनपा निवडणुकीत विकास आघाड्यांची शक्यता संपूष्ठात

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विकास आघाड्यांची शक्यता संपूष्ठात

मुक्तचिन्हे घेवून उतरावे लागणार निवडणूक रिंगणात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू झाली आहे. या निवडणुकीत शहर विकास आघाडी किंवा विकास आघाडी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता पूर्णपणे संपूष्ठात आली आहे. त्यामुळे पक्ष चिन्ह किंवा 3 जानेवारीला चिन्ह वाटपात मुक्तचिन्हे घेऊन त्या माध्यमातून निवडणूक लढवावी लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आघाडी स्थापन करण्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता लागते किंवा मान्यता असलेल्या आघाडीला गेल्या निवडणुकीत एकूण जागांच्या 5 टक्के जागा मिळविणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत बसत नसल्याने आता महापालिका निवडणुकीत विकास आघाड्यांची शक्यता संपूष्ठात आली आहे.

- Advertisement -

महापालिका निवडणुकीत प्रक्रियेत आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. जर विकास आघाडी किंवा शहर आघाडी स्थापन झाली असेल तर आजच निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना चिन्ह राखीव ठेवण्याबाबत मागणी अर्ज करावा लागतो. पण तसा अर्ज केवळ जगदंबा विकास आघाडीचा आलेला आहे. या आघाडीने नजिकची कोणतीही निवडणूक लढली नाही. त्यामुळे या आघाडीला आता 3 जानेवारीलाच मुक्तचिन्हातून चिन्ह निवडावे लागणार आहे. जगदंबा विकास आघाडी ही पाथर्डीमधील घोडके यांची आघाडी असून त्या आघाडीला निवडणूक आयोगाची मान्यता आहे. पण त्या आघाडीने नजिकची निवडणूक लढली नाही. त्या आघाडीच्या माध्यमातून महापालिकेच्या निवडणुकीत एका प्रभागात चार उमेदवार निवडणूक लढणार आहे.

महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वी काही पक्षांकडून समविचारी लोकांना बरोबर घेऊन शहर विकास आघाडी किंवा विकास आघाडी करण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आता बारगळले आहे. जिल्ह्यात विकास आघाडी असून त्या आघाडीला निवडणूक आयोगाची मान्यता देखील आहे. मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षातील एकाही निवडणुकीत विकास आघाडीच्या माध्यमातून कोणीच निवडणूक लढविली नाही. त्यामुळे नजिकच्या कोणत्याही निवडणुकीत आघाडी नसल्याने सहाजिकच महापालिका निवडणुकीत आघाडी माध्यमातून कोणीच निवडणूक लढवू शकणार नाही. तसेच कोणाच्याही नव्याने आघाडीला मान्यता निवडणूक आयोगाकडून नाही. त्यामुळे या निवडणुकीत आता पक्ष चिन्ह नाही तर 3 जानेवारीला चिन्ह वाटपात मिळणार्‍या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

Nashik NMC News : कर वसुलीत मोठा घोटाळा; मनपा कर्मचाऱ्याने केला...

0
नाशिक | Nashik महानगरपालिकेच्या पंचवटी विभागात (Panchvati Divison) कर वसुली प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, घनकचरा विभागातील सफाई कर्मचारी मनीष अशोक जाधव याने...