Friday, April 3, 2026
HomeनगरAhilyanagar : मतदारांना पैशांचे वाटप करणार्‍यावर गुन्हा दाखल

Ahilyanagar : मतदारांना पैशांचे वाटप करणार्‍यावर गुन्हा दाखल

भरारी पथकाच्या प्रमुखांची तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त केलेल्या भरारी पथकाने मंगळवारी (6 जानेवारी) दुपारी दिल्लीगेट भागात एक दुचाकी जप्त करून त्यातून एक लाखाची रोकड हस्तगत केली होती. या प्रकरणी निवडणूक विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख वामन गणपतराव घोळवे (रा. सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुरूवारी (8 जानेवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

फैजान कुतुबुद्दीन जमादार (रा. मुकुंदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. घोळवे यांच्या फिर्यादीनुसार, ते आपल्या पथकासह गस्तीवर असताना दिल्लीगेट परिसरातील मोहनबाग येथे काही व्यक्ती पैसे वाटप करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तेथे दोन मोपेड दुचाकी संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या दिसल्या. त्यातील एका दुचाकीची तपासणी करून ती सोडून देण्यात आली होती. तर दुसर्‍या दुचाकीबाबत कोणीही समोर न आल्याने ती जप्त करून तोफखाना पोलीस ठाण्यात आणण्यात आली होती.

त्याची तपासणी केली असता, त्यात एक लाख रूपये रोकड, दोन महागडी घड्याळे व इतर वस्तू आढळून आल्या. पंचनामा करून एक लाख 45 हजार 300 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर दुचाकी फैजान कुतुबुद्दीन जमादार याची असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला नोटीस बजावून पुरावे सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्याने पुरावे सादर न केल्याने सदर रक्कम मतदारांना वाटपासाठी असल्याच्या संशयावरून त्याच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शहरात आदर्श आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी सुरू आहे. महानगरपालिकेने सहा भरारी पथके नियुक्त केली आहेत. निवडणूक अधिकार्‍यांच्या कार्यालयातही आचारसंहिता कक्ष करण्यात आला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास आचारसंहिता कक्षात संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

सहा हजाराचे आमिष
दरम्यान, याच प्रकरणाशी संबंधित एक तक्रार अर्ज सचिन संतोष दगडे (रा. सांबर गल्ली) यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे दिला आहे. त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की, काही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मतदान करण्यासाठी प्रत्येकी सहा हजार रूपये देण्याचा प्रयत्न केला व नकार दिल्यावर जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. या तक्रारीची पोलिसांनी चौकशी करावी, अशी विनंती फिर्यादीतून करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : खरातच्या पत्नीचे परदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi भोंदूबाबा प्रकरणातील अटक आरोपींच्या तपासादरम्यान पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून समता व जगदंबा नागरी सहकारी...