Wednesday, May 20, 2026
HomeनगरAMC : मनपा कर्मचार्‍याविरूध्द तोफखाना पोलिसांत गुन्हा

AMC : मनपा कर्मचार्‍याविरूध्द तोफखाना पोलिसांत गुन्हा

निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा आरोप

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मतदार यादी अद्ययावतीकरण व मतदार मॅपिंगच्या महत्त्वाच्या निवडणूक कामकाजात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत नगर महानगरपालिकेतील एका कर्मचार्‍याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र फुलारी (रा. नय्यर शाळेसमोर, पाईपलाईन रस्ता, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचार्‍याचे नाव आहे.

- Advertisement -

यासंदर्भात सुनील नेटके (वय 43, रा. शेंडी) यांनी फिर्याद दिली आहे. ते पेमराज सारडा कॉलेजमध्ये ग्रंथालय लिपीक म्हणून कार्यरत असून सध्या 225 नगर शहर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली 10 बीएलओ कार्यरत असून निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अद्ययावत करणे व मतदार मॅपिंगचे काम सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सावेडी परिसरातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी क्रमांक 23 म्हणून कार्यरत असलेले मनपा कर्मचारी राजेंद्र फुलारी यांच्यावर निवडणूक विषयक कामात विलंब, टाळाटाळ, दिरंगाई व हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संबंधित कर्मचार्‍याची सन 2023 पासून बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार त्यांच्यावर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरिक्षणाचे काम सोपविण्यात आले होते. फिर्यादीनुसार, फुलारी यांनी 16 एप्रिल 2026 पासून निवडणूक कामकाज करण्यास टाळाटाळ केली. त्यांना वेळोवेळी बैठका घेऊन तसेच लेखी व तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. 11 मे 2026 रोजी कामावर हजर राहून कामात सुधारणा करण्याबाबत लेखी आदेश देण्यात आले होते. मात्र त्यानंतरही संबंधितांनी मतदार मॅपिंगचे कोणतेही काम पूर्ण केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : राष्ट्रवादीतील मतभेदांना कांद्याचा तडका

0
कांदाप्रश्नाने नाशिकसह उत्पादक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पेट घेतल्याने विविध राजकीय पक्षही सक्रिय झालेले दिसतात. नेहमीप्रमाणे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसने यात आघाडी घेतल्याचे दिसते. नाही म्हणायला...