Monday, May 5, 2025
HomeनगरAhilyanagar : केडगाव डीपी रस्ता कामातील अडथळा दूर

Ahilyanagar : केडगाव डीपी रस्ता कामातील अडथळा दूर

महानगरपालिकेने हटवले अतिक्रमण || रस्त्यांचा प्रश्न सुटणार

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात शासनाच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढली जात आहेत. केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमधील डीपी रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्यासाठी अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यांनी स्वतःहून अतिक्रमणे न काढल्याने महानगरपालिकेने कारवाई करून ही अतिक्रमणे हटवली. त्यामुळे डीपी रस्त्याच्या कामातील अडथळा दूर झाला आहे. पावसाळ्यापूर्वी प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन करून त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

- Advertisement -

केडगाव इंडस्ट्रियल इस्टेटमधील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. या कामात प्रवेशद्वारासमोर सुमारे 10 ते 15 अडथळे होते. या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून मुदत देण्यात आली होती. नोटीस देऊनही अतिक्रमणे न काढल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट गेटसमोरील अतिक्रमणे जमीनदोस्त केली. पत्र्याच्या टपर्‍या, पत्र्याचे शेड, हॉटेल, चहाच्या टपर्‍या अशी 15 अतिक्रमणे हटवण्यात आली. इंडस्ट्रियल इस्टेटमार्गे केडगाव रोड ते लिंक रोड दरम्यान महापालिकेकडून सिमेंट काँक्रिटच्या डीपी रस्त्याचे काम करण्यात येत आहे.

या डीपी रस्त्याच्या कामात ही अतिक्रमणे अडथळा ठरत होती. ही अतिक्रमणे स्वतःहून काढून घ्यावीत, अशी सूचना महापालिकेकडून त्यांना करण्यात आली होती. परंतु, अतिक्रमण धारकांनी स्वतःहून त्यांची अतिक्रमणे काढली नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेने कारवाई करून ही अतिक्रमणे हटवली. अतिक्रमणे हटवून रस्त्याच्या कामात असलेला अडथळा दूर केला आहे. शहरात अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शक्य तेवढे प्रमुख रस्ते खुले करण्यासाठी ती कामे मार्गी लावण्यावर भर देण्यात आला आहे. रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अतिक्रमणे महानगरपालिकेकडून काढण्यात येणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी अटकेत

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar कोतवाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दोन घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये पसार असलेल्या एका संशयित आरोपीला अटक करून त्याच्याकडून एकूण 17 हजार 400 रुपये...