Friday, April 25, 2025
Homeनगर230 मोबाईल टॉवर कंपन्यांकडे 14 कोटींची थकबाकी

230 मोबाईल टॉवर कंपन्यांकडे 14 कोटींची थकबाकी

शासन निर्देशानुसार कारवाई करता येत नसल्याने मनपापुढे वसुलीचा पेच

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात सद्यस्थितीत 230 मोबाईल टॉवरची महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे नोंद असून, संबंधित मोबाईल कंपन्यांकडे मालमत्ता कराची 14 कोटी 21 लाखांची थकबाकी आहे. यात, 171 अधिकृत, तर 59 अनधिकृत आहेत. थकबाकी असूनही शासन निर्देशानुसार मोबाईल टॉवरवर कारवाई करता येत नसल्याने या थकीत रकमेच्या वसुलीचा पेच महापालिकेसमोर निर्माण झाला आहे.

- Advertisement -

दिवसेंदिवस शहराचा विस्तार होत असतानाच विस्तारीत भागात नव्याने मोबाईल टॉवरची उभारणी मोबाईल कंपन्या व टॉवर उभारणार्‍या कंपन्यांकडून केली जात आहे. महापालिकेकडील उपलब्ध आकडेवारीनुसार शहरात 230 टॉवरची नोंद मालमत्ता कर विभागाकडे आहे. त्यात 171 अधिकृत टॉवर असून, सदर कंपन्यांकडे 4 कोटी 19 लाख 87 हजार 578 रुपयांची कराची थकबाकी आहे. तर, 59 अनधिकृत टॉवर असून, संबंधित कंपन्यांकडे 10 कोटी 1 लाख 17 हजार 739 रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे केवळ टॉवर कंपन्यांकडेच 14 कोटी 21 लाख 5 हजार 317 रुपयांची थकबाकी आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी सध्या महापालिका जप्ती कारवाई करत आहे. निवासी व अनिवासी मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली जात आहे.

मात्र, 14.21 कोटींचा कर थकीत असतानाही शासनाच्या निर्देशांमुळे संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांनी टॉवरची सेवा खंडित होणार नाही, त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिलेले आहेत. महापालिका कारवाई करू शकत नसल्याने कंपन्यांकडून थकीत कर भरण्यासाठी मागणी केली जात आहे. त्यामुळे या 14.21 कोटींच्या थकित कराच्या वसुलीचे आव्हान महापालिकेसमोर आहे. दरम्यान, याबाबत आयुक्त यशवंत डांगे यांना विचारले असता, मोबाईल टॉवर कंपन्यांकडून वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत, संबंधित थकबाकीदार कंपन्यांना नोटीस पाठवून त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल करण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...