Saturday, May 4, 2024
Homeनगरऑनलाईन सभेत उत्तरे देण्यासाठी अधिकार्‍यांची दांडी

ऑनलाईन सभेत उत्तरे देण्यासाठी अधिकार्‍यांची दांडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महापालिका अंदाजपत्रकीय सभेस मंगळवारी दुपारी सुरूवातीलाच प्रश्नांवर उत्तर देण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी

- Advertisement -

गायब झाल्याने महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्यासोबत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. नाविलाजाने विभागप्रमुखांना सभागृहात हजर राहण्याचे आदेश आयुक्तांना द्यावे लागले.

सोमवारी मनपा आयुक्त यांनी सव्वा तीन कोटींसह 715 कोटी 71 लाख रूपये जमा बाजू असलेले अंदाजपत्रक महासभेला सादर केला. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर सदस्यांना अभ्यासासाठी एक दिवसाचा वेळ मिळावा म्हणून सोमवारी ही सभा तहकूब करण्यात आली. ही तहकूब सभा मंगळवारी दुपारी एक वाजता सुरू झाली.

लेखा व वित्त अधिकार्यांनी अंदाजपत्रकातील तरतुदी वाचण्यास सुरूवात झाल्यानंतर जाहिरात कराचा विषय येताच मागील व चालू वर्षाच्या दरात काही फरक आहे का, याची माहिती विचारण्यात आली. मात्र त्याचे उत्तर देण्यासाठी वसुली विभागाचे प्रमुख झिने उपलब्ध झाले नाही. तसेच अग्निशमन कराच्या उत्पन्नाबाबत विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर या विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ उपलब्ध होऊ शकले नाही.

विभागप्रमुख उपलब्ध होत नसल्यामुळे महापौर वाकळे, बारस्कर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तसेच अधिकारी ऑनलाईन सहभागी होण्यापेक्षा त्यांनी सभागृहातच येऊन बसावे, अशी सूचना बारस्कर यांनी मांडली. त्यानंतर आयुक्त मायकलवार यांनी स्वत: काही विभागप्रमुखांना फोन करून सभागृहात पाचारण केले.

उत्पन्नाची बाजू गृहित धरताना सारासार विचार झाला नसल्याचे बारस्कर यांनी सांगितले. यावर महापौर वाकळे उत्तर देत असताना बारस्कर यांनी याची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, असे सांगितले. अधिकारी अभ्यास करून सभागृहात येत नसल्याचे मत महापौर आणि बारस्कर या दोघांनीही व्यक्त केले..

दरम्यान, गत आर्थिक वर्षात मोठी तरतूद करूनही त्यातील दमडीही खर्च केली नाही. मागील वर्षीचा खर्च झिरो असतानाही यंदा महापौरांसह इतर पदाधिकारी निधीची तरतूद करण्याची चर्चा महासभेत झाली. अर्थात ही तरतूद मनपा फंडातून असल्याने ठेकेदार यंदा तरी कामे करण्यास राजी होतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. खर्च झाले नसला तरी आवश्यक कामांसाठी यंदा ही तरतूद केली जाईल. वसुली चांगली झाली तर मनपा फंडात पैसे येतात. त्यातून गरजेची कामे करता येवू शकतील. तरतूद करण्याला काही अडचण नाही, असे महापौर वाकळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या