Tuesday, March 25, 2025
Homeनगरदोन लाखांवरील थकबाकीदारांवर होणार जप्ती कारवाई

दोन लाखांवरील थकबाकीदारांवर होणार जप्ती कारवाई

आयुक्तांचे आदेश || शासकीय कार्यालयांचाही समावेश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मालमत्ता करावरील शास्तीमध्ये 100 टक्के सवलत देऊनही अनेक थकबाकीदारांनी कर भरलेला नाही. त्यामुळे सर्व प्रभाग समिती कार्यालयाच्या क्षेत्रातील दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असणार्‍या मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर जप्ती कारवाई सुरू करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

महानगरपालिकेने करावरील शास्तीमध्ये 100 टक्के सवलत दिली होती. या कालावधीत अपेक्षित वसुली न झाल्याने आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे. पाणी योजनेची वीज बिले व इतर देणी थकीत आहेत. त्यामुळे महानगरपालिकेने वसुलीसाठी कारवाई सुरू केली आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीतील दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या करदात्यांची यादी तयार करण्यात आली आहे. यात शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे.

सावेडी प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीत दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेले 138 थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे 10 कोटी 90 लाखांची थकबाकी आहे. सर्व थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्यावर जप्ती कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी तत्काळ थकीत कर भरावा व जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी केले आहे.

सावेडीत 138 जणांकडे 10.90 कोटी थकीत
एकट्या सावेडी प्रभाग समिती कार्यालयाच्या हद्दीतील 138 मोठ्या थकबाकीदारांकडे 10 कोटी 90 लाखांची थकबाकी आहे. यात शासकीय कार्यालयांकडे एक कोटी 89 लाख रूपये थकीत आहेत. थकबाकीदारांनी तत्काळ थकीत कर भरावा. अन्यथा जप्ती कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी दिला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...