Tuesday, May 6, 2025
HomeनगरAMC : मनपाकडून मालमत्ता करामध्ये 10 मे पर्यंत सवलत

AMC : मनपाकडून मालमत्ता करामध्ये 10 मे पर्यंत सवलत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नवीन आर्थिक वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरासह बिले वाटप सुरू करण्यात आले आहे. महानगरपालिका अधिनियमानुसार एप्रिल महिन्यांत सर्वसाधारण करावर 10 टक्के सवलत दिली जाते. यंदा नवीन दरामुळे बिले वाटप उशिराने सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वसाधारण करावरील सवलतीचा लाभ सर्वांना मिळावा, यासाठी सवलतीची मुदत वाढवण्यात आली असून 1 मे 31 मे या कालावधीत सर्वसाधारण करावरील 10 टक्के सवलत कायम ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी याचा लाभ घेऊन वेळेत कराचा भरणा करावा व दंड टाळावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या वसुलीला मागील आर्थिक वर्षात नगरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे विक्रमी वसुली झाली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम 140 अ नुसार करात एप्रिलमध्ये 10 टक्के, मे व जूनमध्ये 8 टक्के अशी सर्वसाधारण करात सूट दिली जाते. या वर्षात पाणीपट्टीच्या नवीन दरानुसार बिले वाटप करण्यासाठी काही प्रमाणात विलंब झाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात दिली जाणारी 10 टक्के सवलत अनेकांना मिळू शकली नाही. नवीन दरानुसार बिलांचे वाटप महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आले आहे.

नागरिकांना सवलतीचा लाभ मिळावा, यासाठी मे महिन्यातही 10 टक्के सवलत सर्वसाधारण करावर दिली जाणार आहे. तसा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, काही अडचणींमुळे बिले न मिळाल्यास, नागरिकांनी त्यांच्या प्रभाग समिती कार्यालयात जाऊन बिल काढून घ्यावे व सवलतीचा लाभ घेऊन तत्काळ कराचा भरणा करावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : चौंडीतील मंत्रीमंडळाची बैठक जिल्ह्याच्यादृष्टीने ऐतिहासिक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar चौंडी येथे मंत्रीमंडळाची प्रथमच होत असलेली बैठक जिल्ह्याच्यादृष्टीने ऐतिहासिक क्षण आहे. अहिल्यानगरच्या विकासाच्या वाटचालीसाठी बैठक महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे...