Wednesday, August 19, 2026
HomeनगरAMC : महिनाभरात 45 कोटींच्या थकीत कर वसुलीचे टार्गेट

AMC : महिनाभरात 45 कोटींच्या थकीत कर वसुलीचे टार्गेट

मालमत्ता जप्त करून ताब्यात घेण्याचा आयुक्तांचा इशारा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महानगरपालिकेच्या मालमत्ताकर व पाणीपट्टीची थकबाकी 275 कोटींवर पोहोचली आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी चारही प्रभाग समिती कार्यालयाच्या प्रभाग अधिकारी व वसुली कर्मचारी, अधिकार्‍यांना येत्या महिनाभरात 45 कोटींचे टार्गेट देण्यात आले आहे. कर्मचार्‍यांनी वसुली न केल्यास त्यांच्यावरही कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. महिनाभरात मोकळे भूखंडधारक व व्यावसायिक मालमत्ता धारकांनी थकीत कर न भरल्यास मालमत्ता जप्त करून ताब्यात घेण्यात येणार आहेत. तसेच, यापुढे कोणत्याही परिस्थितीत शास्तमाफी होणार नाही, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

डांगे यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेत कर वसुली व थकबाकीचा आढावा घेण्यात आला. व्यावसायिक मालमत्तांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. तसेच, शासकीय जिल्हा रूग्णालय, जिल्हा परिषद, जुने कलेक्टर ऑफिस, पाटबंधारे विभाग, पंचायत समिती, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन व इतर शासकीय कार्यालयांकडे सुमारे 6 कोटी थकबाकी आहे. बंद पडलेल्या मोबाईल टॉवरकडे सुमारे 4 कोटी थकबाकी आहे. 16 हजार 524 व्यावसायिक मालमत्ताधारकांकडे सुमारे सात कोटी रूपये थकीत आहेत. 33 हजार 407 मोकळ्या भूखंड धारकांकडे 12 कोटी रूपये थकबाकी आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर अखेर 35 कोटी रूपये वसुली झाली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात प्रभाग समिती एक व चार यांना प्रत्येकी 15 कोटी रूपये, प्रभाग समिती दोनला 10 कोटी, प्रभाग समिती तीनला 5 कोटी असे 45 कोटींचे टार्गेट देण्यात आले आहे. वसुली न झाल्यास संबंधित अधिकारी व लिपिक यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे डांगे यांनी स्पष्ट केले. ओपन प्लॉट धारकांनी व व्यावसायिक मालमत्ता धारकांनी एक महिन्यात पैसे न भरल्यास त्या प्लॉटचा किंवा व्यावसायिक मालमत्तेचा ताबा महानगरपालिका कायदेशीर रित्या घेणार असल्याचा इशारा देत कोणत्याही परिस्थितीत शास्तमाफी होणार नाही, असेही डांगे यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

त्र्यंबकेश्वर येथे भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सोई सुविधा उपलब्ध करून द्याव्यात...

0
नाशिक, दि. १९ ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा) : श्रावण मासानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भाविकांना मूलभूत सोयीसुविधा...