Wednesday, April 2, 2025
HomeनगरAMC : आर्थिक वर्षात मनपाची विक्रमी कर वसुली

AMC : आर्थिक वर्षात मनपाची विक्रमी कर वसुली

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सन 2024-2025 या आर्थिक वर्षात महानगरपालिकेच्या मालमत्ता कर व पाणीपट्टीची विक्रमी वसुली झाली आहे. वर्षभरात 72 हजार 66 करदात्यांनी कर भरला असून 61.18 कोटींची वसुली झाली आहे. शास्तीमाफी योजनेत 16 हजार 787 करदात्यांनी लाभ घेऊन 17.18 कोटींचा कर भरला आहे. त्यामुळे वर्षभरात 80.58 कोटींच्या वसुलीची नोंद होऊन 19.39 कोटींची सवलत देण्यात आली व 61.18 कोटी रूपये महानगरपालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

- Advertisement -

मनपा आयुक्त यांनी मंगळवारी महानगरपालिकेत आढावा बैठक घेतली. यात सुरूवातीलाच वसुली विभागाकडून आर्थिक वर्षात झालेल्या वसुलीची माहिती देण्यात आली. यावर्षी सर्वाधिक 61.18 कोटी रूपये वसूल झाले आहेत. यात शास्तीमाफी योजनेमुळे 17.18 कोटी वसूल झाले आहेत. महानगरपालिकेच्या कर वसुलीमध्ये वर्षभरात ऑनलाईन कर भरणार्‍यांची संख्याही वाढली आहे. वर्षभरात 15 हजार 831 करदात्यांनी ऑनलाईन पध्दतीने कर भरला आहे. एकूण वसुलीच्या तुलनेत ऑनलाईन कर भरणार्‍यांचे प्रमाण 21.96 टक्के आहे. नव्या आर्थिक वर्षापासून नवीन दरानुसार पाणीपट्टी आकारण्यात येणार आहे. तसेच, मालमत्तांचे सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकन सुरू असून यामुळे अनेक नवीन मालमत्ता कराच्या कक्षेत येणार आहेत.

मोजमापे अद्ययावत होणार असल्याने घरपट्टीची मागणीही आपोआप वाढणार आहे. दरम्यान, कर वसुली हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. चांगली वसुली झाल्यास नागरिकांना दिल्या जाणार्‍या सेवा अधिक बळकट करता येतील व अधिक चांगल्या सुविधा देता येतील. त्यामुळे मालमत्ताधारकांनी नियमित कर भरावा. एप्रिल महिन्यात संकलित करावर 10 टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे मालमत्ताधारकांनी कराचा भरणा करून या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar तोफखाना पोलिसांनी सावेडी उपनगरातील सोनानगर चौकातील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर हुक्का पार्लरवर छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत विविध हुक्का...