Wednesday, January 7, 2026
HomeनगरAMC : नवीन संस्था करणार रस्ता बाजू शुल्काची वसुली

AMC : नवीन संस्था करणार रस्ता बाजू शुल्काची वसुली

जादा वसुली केल्यास तक्रार करण्याचे आवाहन

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरातील रस्त्यांच्या कडेला स्टॉल, हातगाड्या किंवा तत्सम साधनांव्दारे व्यवसाय करणार्‍या सर्व विक्रेत्यांकडून महानगरपालिका आकारणी करत असलेल्या रस्ता बाजू शुल्क व स्लॉटर शुल्क वसुलीची जबाबदारी आता खासगी संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेनंतर मे. वंशिका एन्टरप्रायजेस या संस्थेची एक वर्षासाठी निवड करण्यात आली असून, मंगळवार, 25 नोव्हेंबरपासून शहरात या संस्थेने शुल्क वसुलीचे कामकाज सुरू केले असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

- Advertisement -

यापूर्वी हे काम जुन्या ठेकेदार संस्थेकडे होते. मात्र त्यांचे कामकाज बंद झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून मार्केट विभागातील कर्मचार्‍यांकडून थेट शुल्क वसुली केली जात होती. शहरातील भाजी, फळ विक्रेते तसेच रस्त्यावर साहित्य, खाद्यपदार्थ विकणारे सर्वच व्यापारी यांच्याकडून हे शुल्क आकारले जाते. महानगरपालिकेकडून निश्चित केलेल्या दरांनुसार- 5 बाय 4 फुटापर्यंत जागेत व्यवसाय करणार्‍याकडून 10 रूपये प्रति दिवस, अधिक जागेसाठी प्रति चौरस फुट 1 रूपये अतिरिक्त, सायंकाळी व्यवसाय करणार्‍यांसाठी 15 रूपये प्रति दिवस, त्यापुढील जागेसाठी प्रति चौरस फुट 1 रूपये अतिरिक्त, स्लॉटर शुल्क प्रति नग 5 रूपये या शुल्कापेक्षा अधिक रक्कम मागणार्‍या कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडे विक्रेत्यांनी शुल्क न देता त्वरित महानगरपालिकेकडे तक्रार करावी, असे सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत. जादा रक्कम वसुली होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

YouTube video player

दरम्यान मनपाच्या कर्मचार्‍यांकडून करण्यात आलेल्या वसुलीनुसार सन 2023-24 मध्ये 13.50 लाख रूपये आणि सन 2024-25 मध्ये 10 लाख रूपये उत्पन्न मिळाले होते. नवीन ठेकेदार संस्थेमार्फत वर्षाकाठी सुमारे 20 लाख रूपये (जीएसटीसह) मनपाला मिळण्याची अपेक्षा आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीवरून झेडपी, जिल्हा रुग्णालयात पत्रप्रपंच!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar दिव्यांग मंत्रालयाचे सचिव तुकाराम मुंडे हे प्रशासनावरील पकड व शिस्तीसाठी गणले जातात. मात्र, त्यांनी साडेतीन महिन्यांपूर्वी दिव्यांग तपासणीच्या दिलेल्या आदेशाला अहिल्यानगर जिल्हा...