Wednesday, January 7, 2026
HomeनगरAMC : महापालिका प्रारूप मतदार यादीतील गोंधळ वाढला

AMC : महापालिका प्रारूप मतदार यादीतील गोंधळ वाढला

440 हरकती || आयुक्तांनी दिल्या तातडीने निपटार्‍याच्या सूचना

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर होताच मोठ्या प्रमाणावर झालेल्या त्रुटी समोर येऊ लागल्या आहेत. अनेक प्रभागांमध्ये मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याचे स्पष्ट होत असून, यादीवर नागरिकांकडून हरकती आणि तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडत आहे. आतापर्यंत तब्बल 440 हरकती दाखल झाल्या असून, त्या कशाप्रकारे निकाली काढाव्यात याबाबत महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.

- Advertisement -

मंगळवारी (25 नोव्हेंबर) आयुक्त यशवंत डांगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या तक्रारींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. उपायुक्त विजयकुमार मुंडे, बीएलओ यंत्रणा आणि संबंधित विभागातील कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते. प्रभागनिहाय प्रकाशित करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती दिसून येत असल्याने आयुक्तांनी प्रत्येक प्रकरणाचे स्थळ पाहणीसह काटेकोर पडताळणी करून निपटारा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

YouTube video player

प्रभागातील काही भागांमध्ये एकाच परिसरातील घरे एका प्रभागात, तर त्याच घरांची मतदानाची नावे दुसर्‍याच प्रभागात नोंद झाल्याचे आढळले. सीमेलगतच्या वस्त्यांमध्ये तर हा गोंधळ अधिकच मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे. इच्छुक उमेदवार आणि नागरिकांमध्ये त्यामुळे मोठी धावपळ सुरू झाली आहे. अ, ब नमुन्यांमध्ये आलेल्या हरकतींची लिपिकीय पडताळणी आणि प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी करून निर्णय घ्यावा, वरिष्ठ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेऊनच अंतिम निपटारा करावा, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार तातडीने कारवाई करण्यावरही भर देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...