Friday, April 3, 2026
HomeनगरAMC : महापालिकांच्या मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर

AMC : महापालिकांच्या मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर

20 नोव्हेंबरला प्रारूप तर 12 डिसेंबरला अंतिम मतदार यादी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य निवडणूक आयोगाने अहिल्यानगर महानगरपालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केलेला कार्यक्रम आता बदलून नवीन वेळापत्रकानुसार प्रक्रिया पार पडणार आहे. आज, शुक्रवार 14 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होणारी प्रारूप मतदार यादी आता 20 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द केली जाणार आहे.

- Advertisement -

नागरिकांना या यादीवरील हरकती व सूचना 27 नोव्हेंबर पर्यंत दाखल करता येतील. यानंतर प्राप्त हरकतींचा विचार करून आणि आवश्यक दुरूस्ती करून 5 डिसेंबर रोजी प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अधिप्रमाणित करण्यात येईल. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी जाहीर केली जाईल, तर 12 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने सर्व महानगरपालिका आयुक्तांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत.

मतदार यादी तयार करताना काही तांत्रिक अडचणी आल्यास त्या त्वरित ई-मेलव्दारे आयोगाच्या निदर्शनास आणाव्यात. अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठी आयोगाशी दूरध्वनीव्दारे संपर्क साधण्याचाही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यभरातील महानगरपालिका निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, सुधारीत वेळापत्रकानुसार मतदार यादीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

ताज्या बातम्या

“बारामतीत आपले मोठे मन दाखवावे, सुनेत्रा पवार…”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे काँग्रेसला...

0
मुंबई । Mumbai राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी अखेर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. निवडणूक...